जालना: “मला शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. आजूबाजूचे शेतकरी मला त्यांच्या शेतातून जाऊ देत नाही. त्यामुळे शेतात जाण्यासाठी मला रस्ता द्या, किंवा हेलिकॉप्टर तरी घेऊन द्या”, अशी लेखी मागणी जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यानं जाफ्राबादच्या तहसीलदारांकडे केली आहे.

सुनील भोपळे असं हेलिकॉप्टरची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव असून सुनीलची जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातील देऊळझरी शिवारातील गट नंबर ३५० मध्ये जमीन आहे. शेतीची कामे सुरू असून त्यासाठी रोज शेतात जावे लागते. खरं तर त्यांना त्यांच्या शेतीत जाण्यासाठी दुसऱ्यांच्या शेतातून जावं लागत होतं. पण शेजारील शेतकऱ्यांनी सुनील यांना त्यांच्या जमिनीतून तसेच शेतीच्या बाजूने असलेल्या पाऊल वाटेने जाण्यासाठी मनाई केली.

Farmer Demanded

शेजारील शेतकरी त्यांना शेती मशागतीसाठी जाऊ देत नाही व रस्ता देखील देत नाही. त्यामुळे वैतागलेल्या या शेतकऱ्यानं अखेर जाफराबादच्या तहसीलदारांना गाठून हेलिकॉप्टरची लेखी मागणी केली आहे. त्याच्या या मागणीमुळे तहसीलदार चक्रावले खरे, पण त्याच्या मागणी मागचे कारण लक्षात येताच तहसीलदार साहेबांनी तत्काळ तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांना पाठवून पंचनामा केला आहे.

मुखेडमध्ये मुसळधार पाऊस; पुराच्या पाण्यात अडकलेल्या ३५ शेतकऱ्यांची जेसीबीच्या मदतीनं सुटका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here