वैद्यकीय पार्श्वभूमीवर शरीफ यांना मंजूर करण्यात आलेल्या चार आठवड्यांच्या जामिनाची मुदत गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच संपली आहे. त्यामुळे सरकारने त्यांना फरार घोषित केले आहे. त्यांच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटीश सरकारकडे विनंती करण्यात आली आहे,’ असे उत्तरदायित्व व अंतर्गत प्रकरणांसंबंधीचे पंतप्रधानांचे सल्लागार शाहझाद अकबर यांनी माध्यामांना सांगितले.
वाचा:
शरीफ यांनी मागील आठवड्यात लाहोर येथील न्यायालयाला आपण पाकिस्तानमध्ये परतण्यास असमर्थ असल्याचे सांगितले होते. करोना प्रादुर्भावामुळे सध्या प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याचे कारण त्यांनी दिले. वकिलांमार्फत शरीफ यांनी आपला वैद्यकीय अहवाल लाहोर उच्च न्यायालयासमोर दाखल केला. रक्तपेशींचे कमी प्रमाण, मधुमेह, किडनी, हृदयाशी संबंधित आजार असल्यामुळे आपल्या पाकिस्तानात परत येणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
वाचा:
उत्तरदायित्व व अंतर्गत प्रकरणांसंबंधीचे पंतप्रधानांचे सल्लागार शाहझाद अकबर यांनी सांगितले की, शरीफ यांची प्रत्यार्पण प्रक्रिया पुढे सुरू करण्यात येणार आहे. सरकारकडून शरीफ यांना पाकिस्तानमध्ये पु्न्हा आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
वाचा:
पाकिस्तान सरकारने ब्रिटन सरकारला याबाबतची माहिती दिली आहे. त्याशिवाय त्यांच्या प्रत्यार्पणाचीही विनंती केली आहे. पाकिस्तानमधील वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, शरीफ हे मुलासोबत लंडनमध्ये फिरत असल्याचा फोटो समोर आला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सरकारने म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधानपद तीन वेळेस भूषवलेले नवाझ शरीफ हे उपचारासाठी १९ नोव्हेंबर २०१९ रोजी लंडन येथे रवाना झाले होते. शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणी कोर्टाने दोषी ठरवले आहे. पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईस सुरुवात केली आहे. काही महत्त्वांच्या नेत्यांना अटक झाली असून काहींवर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यामुळे इम्रान खान हे विरोधी पक्षालाच संपवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
Thanks so much for the blog post.
Thank you ever so for you article post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.