आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना अमोल कोल्हे यांनी हा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला चार वेळा मतदारसंघातून लढण्याची संधी दिली. तरीही त्यांच्या संकटाच्या काळात तुम्ही त्यांना सोडून गेलात. शरद पवार साहेबांनी मला एकदाच तिकीट दिलं आणि आज त्यांच्यावर संकट आहे आणि मी त्यांच्या सोबत आहे. हा आपल्या दोघांमधला फरक असल्याचे म्हणत कोल्हे यांनी आढळराव पाटलांना प्रत्युत्तर दिले. आढळराव पाटील हे बोलतात एक अन् करतात दुसरेच असाही आरोप अमोल कोल्हे यांनी केला. या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड करून शिंदे – फडणवीस सरकारसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यात अमोल कोल्हे यांनी केलेला दावा हा आढळरावांसाठी खरंच चिंता वाढणारा आहे का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. आज ते त्यांच्या सोबत उभे आहेत. मात्र कोल्हे यांनी केलेल्या दाव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
Home Maharashtra Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील बडा नेता...
Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील बडा नेता शरद पवारांच्या संपर्कात, अमोल कोल्हेंचा दावा
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि शिंदे शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे. आढळराव पाटील दार ठोठावत असले तरी त्याच्या किल्ल्या मात्र माझ्याकडे असल्याचे कोल्हे यांनी सांगितले आहे. अमोल कोल्हे यांनी केलेला हा दावा कितपत खरा आहे, हे पाहणे आता महत्त्वाचे आहे.