धुळे: धुळे तालुक्यातील कुंडाणे, वेल्हाणे येथे बुधवारी मध्यरात्रीनंतर पतीने पत्नीचा खून करत नंतर स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात पतीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पतीने आपल्या पत्नीला अनैतिक संबंधाच्या संशयावरून जबर मारहाणी केली. पतीने प्रथम पत्नीचे दात पाडून त्यानंतर हात मोडून तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिला ठार केले. त्याने चिठ्ठीत काही कारणे नमूद करून स्वयंपाकघरात स्लॅबच्या कडीला गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची कुंडाणे गावात गंभीर चर्चा आहे. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
लिफ्ट देऊन स्कूटीवर विद्यार्थिनी-महिलांशी अश्लील चाळे, मग मारण्याची धमकी, पण अखेर…
मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती कारणासह चारित्र्याच्या संशयावरून पती जितेंद्र बालू सोनवणे (३०) याने पत्नी प्रतीक्षा जितेंद्र सोनवणे (२५) हिचा खून केला. नंतर स्वतः आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या दांपत्याला तीन वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी आहे. त्याच्या आत्महत्येमागचे मूळ कारण पोलिसांनी शोधावे तसेच खुनाचे आणि त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत संशयितांचा शोध घेऊन त्याला अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

आत्महत्येपूर्वी जितेंद्रने मुंबईतील भाऊ गणेश (३५) यास मुलांचा सांभाळ कर, असा मोबाईवर मेसेज पाठविला. तो गणेशने पहाटे पाचनंतर पाहिला. त्याने संपर्क केल्यानंतर जितेंद्रच्या मुलीने घडलेली घटना सांगितली. जितेंद्रचे आई-वडील बदलापूर येथे मोठ्या मुलाकडे गेले होते. मृत जितेंद्रने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी, काही व्हिडिओ क्लिप, मेसेज संशयास्पद आहेत. त्याची चौकशी करून या दांपत्याच्या आत्महत्या किंवा टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त केलेल्या संशयितांचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशीही मागणी आता होत आहे.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

दरम्यान कुंडाणे गावात जितेंद्र सोनवणेचे घर सकाळी साडेसहा ते सातपर्यंत बंद असल्यामुळे शेजारच्यांनी आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलीस पाटलांना याची माहिती दिली. त्यांच्यासह ग्रामस्थांनी दरवाजा तोडून घरात पाहिले असता सोनवणे दांपत्य गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. घटनेची माहिती मिळताच तालुक्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विजया पवार, हवालदार सुनील जोहरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सोनवणे दांपत्याचे मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी कैलास श्यामराव पाटील यांच्या फिर्यादीनुसार धुळे तालुका पोलिस ठाण्यात मयत पती जितेंद्र सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here