नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत विचारविनियम करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक सुरू असून या बैठकीत काँग्रेस पक्षामधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिण्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे ज्येष्ठ नेते नाराज झाले असून त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ‘आम्ही राजस्थानात सत्ता वाचवण्यासाठी लढत होतो, पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आजारी होत्या, अशा अवस्थेत काँग्रेसच्या अध्यक्षपदनिवडीबाबत हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र का लिहिले गेले?’, असा सवाल उपस्थित करतानाच, या पत्रामागे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र असल्याचे यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी याच्या व्यतिरिक्त प्रियांका गांधी यांनी देखील अशा प्रकारचे पत्र लिहिल्याबाबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते यांच्याकडे नाराजी बालून दाखवली आहे.

हे सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन- गुलाम नबी आझाद

अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून सोनिया गांधींना पत्र लिहिणे हे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र असल्याच्या राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद नाराज झाले आहेत. जर माझे भाजपाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले तर मी राजीनामा देईल, असे गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

यांनीही व्यक्त केली नाराजी

पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी म्हणतात की आम्ही भाजपला मिळालेलो आहोत… राजस्थानातील काँग्रेस सरकार वाचवण्याच्या लढाईत राजस्थान हायकोर्टात आपल्याला यश मिळाले आहे. मणिपूरमध्ये देखील भाजपला खाली खेचण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या ३० वर्षांपासून भाजपच्या बाजूने मी एकही वक्तव्य केलेले नाही, तरी देखील आम्ही मिळालेलो आहोत, अशा शब्दांत सिब्बल यांनी आपले म्हणणे मांडलेले आहे.

नंतर सिब्बल यांनी आपले ट्विट काढून टाकले

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here