केंद्र सरकारच्या कर कपातीनेमुळे साखर, मिठाई, राईचा सॉस, केचअप, साबण, दंतमंजन, मिनरल वॉटर, अगरबत्ती, खाद्य तेल, दुग्धजन्य पदार्थ, हेअर ऑइल, १००० रुपयांपर्यंतचे फुटवेअर, रंग या वस्तूंच्या केली आहे.
देशात १ जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू करण्यात आला. ही कर प्रणाली लागू झाल्यापासून सातत्याने जीएसटी दर कमी करण्यात आला असल्याचे सरकारने म्हटलं आहे. आता केवळ लक्झुरी वस्तूंसाठी २८ टक्के जीएसटी आहे. एकूण २३० वस्तूंपैकी २०० वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला असल्याचे अर्थ खात्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
याशिवाय जीएसटी लागू झाल्यानंतर जीएसटी करदात्यांच्या संख्या दुप्पट झाली आहे. सध्या १ कोटी २४ लाख जीएसटी करदाते आहेत. संपूर्ण जीएसटी प्रक्रिया आता स्वयंचलित झाली असल्याचा दावा अर्थ खात्याने केला आहे. आतापर्यंत जीएसटी प्रणालीत ५० कोटी कर परतावे देण्यात आले. तर १३१ कोटी ई वे बिल तयार झाली असल्याचे सरकारने म्हटलं आहे.
अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक असलेल्या स्थावर मालमत्ता क्षेत्रातला सावरण्यासाठी सरकारने विशेष काळजी घेतली आहे. गृहनिर्माण क्षेत्रासाठी ५ टक्के जीएसटी असून परवडणाऱ्या घरांसाठी तो केवळ १ टक्का आहे. वस्तू आणि सेवा कर प्रणालीची घडी बसवण्यापासून त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यात दिवंगत अरुण जेटली यांचा मोलाचे योगदान आहे. देशातील कर प्रणालीत ऐतिहासिक सुधारणा म्हणून त्याची नोंद होईल, असे ट्विट करून अर्थ खात्याने जेटली यांना आदरांजली वाहिली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
I like the valuable information you provide in your articles.
I really like and appreciate your blog post.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.