कोल्हापूर: अलीकडच्या काळात मायक्रो फायनान्सच्या दुष्टचक्रात महिला अडकलेल्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी लवकरच अभ्यासगटाची नियुक्ती करणार असल्याचे ग्रामविकास मंत्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी मंत्री मुश्रीफ पुढे सांगितले की, बचत गटामार्फत महिला सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकार दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करत आहे. बचत गटांची निर्मिती, अनुदान, सुलभ कर्जे, व्याजामध्ये सवलत अनुदान, बचतगटांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सरकारकडून भरघोस प्रयत्न सुरू आहेत. अनेक अभियानातून महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत.

वाचा:

मुश्रीफ म्हणाले, सरकार मदत करत असतानाही आजही हजारो महिला मायक्रो फायनान्सच्या फेऱ्यांमध्ये अडकलेल्या आहेत. राज्यामधील अनेक महिला मायक्रो फायनान्सच्या कर्जास माफी द्यावी, अशी मागणी करत आहे. ही वेळ त्यांच्यावर का आली? यावर अभ्यास करून त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी, एमएसआरएलएम माध्यमातून त्यांना काय मदत करता येईल, इत्यादी बाबतीत एक महिलाचा अभ्यासगट नियुक्त करण्याचा सरकार गंभीर विचार करत आहे. लवकरच यावर निर्णय अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

4 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here