पुणे: सर्वोच्च न्यायालयातील प्रख्यात व ज्येष्ठ वकील यांच्या समर्थनार्थ आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सुनावलेल्या शिक्षेविरोधात आज अनेक वकील रस्त्यावर उतरले. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवाराबाहेर या वकिलांनी काळ्या फिती बांधून शांततापूर्ण निषेध सभा घेतली.

‘लोकायत’चा वकील विभाग, ‘समतेसाठी वकील’ तसेच जिल्हा न्यायालयातील विविध वकील संघटना सामील झाल्या होत्या. अ‍ॅड. प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याबाबत दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांनी केलेले दोन ट्वीटस त्यासाठी कारणीभूत ठरले आहेत. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाबद्दल ज्येष्ठ विधिज्ञांनी असहमती दर्शवली आहे. ‘भूषण यांची वक्तव्ये अयोग्य, तर्कविसंगत असू शकतात. परंतु यातून न्यायालयाची अवमानना होत नाही,’ असं मत आंदोलनकर्त्या वकिलांनी मांडलं.

वाचा:

‘सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत तत्परतेने निर्णय देत त्यांना दोषी ठरवले. न्यायव्यवस्थेवर टीका करणे म्हणजे तिचा अपमान करणे आहे का? टीका करणे म्हणजे अपमान करणे नाही. याचा अर्थ असा होतो की आपण टीकाच करू नये. जे बोलायचे ते चांगले बोलावे नाहीतर गप्प बसावे. पण संविधानाच्या कलम १९(१)(अ) नुसार देशातील प्रत्येक नागरिकास भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे. वरील कारवाईमुळं एक प्रकारे या हक्काची पायमल्ली होत आहे, असं काही कायदेतज्ज्ञांचं मत आहे. हे मत जाहीरपणे व्यक्त करण्यासाठी आज पुणे जिल्हा न्यायालयातील अनेक वकिलांनी एकत्र येत काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला.

‘संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार अबाधित राहावे म्हणून आम्ही बोलतोय, विरोध दर्शवतोय. आपले हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. आम्ही ते कर्तव्य बजावत आहोत,’ असे प्रतिपादन निदर्शनात सहभागी झालेल्या वकिलांनी व्यक्त केले.

वाचा:

प्रशांत भूषण यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट करून सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. तसंच, दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांवर आरोप केले होते. या चौघांनी लोकशाही उद्ध्वस्त करण्यात भूमिका बजावल्याचं त्यांनी म्हटलं होतं. न्यायालयानं भूषण यांच्या याच वक्तव्यांची गंभीर दखल घेतली असून भूषण यांना माफी मागण्यास बजावले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here