जयपूर: दारुचे पैसे न दिल्याने प्रियकराने प्रेयसीवर धारदार चाकूने हल्ला केला. यानंतर आरोपी प्रेयसीला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून तो पळ काढला. त्यादरम्यान, शेजाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. जखमी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजस्थानच्या जयपूरची ही घटना असल्याची माहिती आहे.

४ जुलै रोजी २२ वर्षीय संध्या ही आई-वडिलांच्या घरी आली होती. गेल्या ६ वर्षांपासून ती तिचा प्रियकर इरशादसोबत मध्य प्रदेशातील राजगड येथे राहत होती. पण, घरातून पळून गेल्यानंतर ती पहिल्यांदाच प्रियकरासोबत जयपूरला परतली होती. इर्रशाद याने ५ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास संध्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली.

बुटाच्या लेसने गळा आवळला, पोलिसांना पुरावा सापडेना; दातांच्या खुणा अन् धक्कादायक सत्य समोर
शेजाऱ्यांनी आरोपी बॉयफ्रेण्डला पकडले

मात्र, गर्लफ्रेण्डने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या इरशादने प्रेयसीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पैसे न मिळाल्याने संतापलेल्या इरशादने संध्यावर चाकूने हल्ला केला. संध्या रक्ताच्या थारोळ्यात पडली.

यानंतर इरशादला वाटलं की गर्लफ्रेण्डचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तो घाबरला आणि पळू लागला. दरम्यान, हा प्रकार पाहून नातेवाईकांनी आरडाओरड सुरू केली. घटनास्थळी पोहोचलेल्या शेजाऱ्यांनी आरोपीला पकडले. सध्या संध्याची प्रकृती धोक्याबाहेर असून तिच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे

आईचा एक गुरुमंत्र अन् मुलगा क्षणात कोट्यधीश झाला, कहाणी वाचून थक्क व्हाल…
आरोपीने संध्यासोबत मंदिरात लग्न केले

या प्रकरणाचा तपास करत असलेले सहाय्यक पोलिस आयुक्त अभिषेक शिवहरे यांनी सांगितले की, संध्या आणि तिचा आरोपी प्रियकर इरशाद अनेक वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघेही ४ जुलै रोजीच जयपूरला परतले होते. दुसऱ्या दिवशी ५ जुलै रोजी आरोपीने दारूसाठी पैशांची मागणी केली, त्यानंतर प्रकरण इतके वाढले की त्याने प्रेयसीवर हल्ला केला. आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आरोपींनी संध्यासोबत मंदिरात लग्नही केल्याचे समोर आले आहे.

सुदैवाने जीव वाचला, नाहीतर आज माझी मुलगी दिसली नसती; पीडित तरुणीच्या आईने सांगितली हकिगत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here