नाशिक: राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे कोणीतरी नाराज होणारच. पण सरकार मजबूत आहे, असा निर्वाळा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी दिला आहे.

नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी काँग्रेसमधील नाराज आमदारांच्या मुद्द्यावर हा निर्वाळा दिला. तीन पक्षाचं सरकार असल्यावर कोणीतरी नाराज होणारच. ते स्वाभाविक आहे. मात्र सरकारला त्याचा काहीच धोका नाही. सरकार मजबूत आहे. निधी वाटपावरून नाराज असलेल्या काँग्रेसच्या ११ आमदारांसोबत चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्यात येईल, असं भुजबळ म्हणाले.

नाशिक जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत असले तरी स्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था पुरेशी आहे. प्रत्येक गल्लीबोळात जाऊन करोनाची टेस्ट करण्यात आली. त्यामुळे करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे, असं सांगतानाच रुग्ण वाढत असले तरी देशात नाशिकचा रिकव्हरी रेट चांगला आहे, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी गुजरातला जाणारे पाणी अडवण्याची गरज असल्याचंही सांगितलं. गुजरातला वाहून जाणारं पाणी नाशिकला वळवणं आवश्यक आहे. आताच हे पाणी अडवलं नाही तर पुढे कधीही हे पाणी अडवणं शक्य होणार नसल्याचं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे देण्यात आल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली . राजपूत प्रकरण सीबीआयकडे गेलं हे बरं झालं. नाहीतर मुंबई पोलीस चांगलं काम करत नाहीत. कुणाला तरी वाचवत आहेत, असा आरोप झाला असता. आता हा तपास सीबीआयकडे गेल्याने सत्य बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, काँग्रेसचे जालन्यातील आमदार ठाकरे सरकारवर नाराज आहे. निधी वाटपात दुजाभाव करत आहे. त्यावर आम्ही नाराज आहोत. सर्वांना मतदारसंघात काम करायचं आहे. त्यामुळे निधी वाटप समानपद्धतीने झालं पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. आम्ही राज्यातील काँग्रेस नेतृत्वाकडे आमची नाराजी व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील ११ आमदार नाराज असून आम्ही उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कैलास गोरंट्याल यांनी दिली. तसेच राज्यात निधीचं समान वाटप होणार नसल्याची तक्रार काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे करण्यात येणार असून त्याबाबत सोनिया गांधींची लवकरच भेट घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गोरंट्याल यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने राज्य सरकारसमोरचं विघ्न वाढलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here