मुंबईः कोकणच्या चाकरमान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी त्यांना गावाला सुखरुप जाता यावे यासाठी एसटी महामंडळाने ज्यादा बस सोडल्या होत्या. त्यानंतर गणपती उत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठीही एक हजार पेक्षा अधिक बस आरक्षित केल्या आहेत.

मुंबईतील चाकरमान्यांना कोकणातून येण्यासाठी एसटीच्या तब्बल १ हजार १४८ बस आरक्षित केल्या असून त्यापैकी ३४६ बसेसचे ग्रुप आरक्षण झाले आहे तर, ३६६ बसेसचे व्यक्तिगत आरक्षण फुल्ल झाले आहे. याबरोबरच उर्वरित ४३६ बसेस ह्या अंशतः आरक्षित झालेले आहेत

यंदाच्या गणेशोत्सावर करोनाचे सावट असल्यामुळे मुंबईतल्या बहुतांश चाकरमान्यांनी कोकणात जाऊन गणपती उत्सव साजरा करण्याचे टाळले, परंतु ज्या चाकरमान्यांना आपल्या मूळ गावी जाऊन गणपती उत्सव साजरा करण्याची इच्छा होती. अशा अनेक सर्वसामान्य चाकरमान्यांना नेहमीच्या तिकीट दरांमध्ये सुरक्षित व सुखरूप घरी पोहोचविण्यात एसटीने मोलाची भूमिका बजावली आहे. राज्य शासनाने घालून दिलेल्या कोविड-१९ च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करित , एसटीने प्रवासी वाहतूक केली आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना अधिक सुविधा म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने ८ सप्टेंबर २०१८ ते १२ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये नियमित वाहतुकीशिवाय जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील बसस्थानके, तसेच बसथांब्यांवर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत असे एसटी महामंडळाने जाहीर केले आहे. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी ‘वाहन दुरुस्ती पथक ‘ (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असल्याचेही महामंडळाने म्हटले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here