चंद्रपूर: चार मुले वर्धा नदीच्या पात्रात पोहायला गेली होती. त्यातील एक मुलगा परत आला. मात्र तीन मित्र वाहून गेल्याचे समोर आले आहे. घटना कळताच गावकऱ्यांनी लगेच नदीपात्राकडे धाव घेतली. नदी किनाऱ्यावर मुलांचे कपडे दिसून आले आहेत. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली आहे.
पावसाळी पर्यटनाचा बळी! तलावात पोहण्यासाठी मारलेली उडी ठरली अखेरची, तरुणाचा दुर्दैवी अंत
प्रतिक नेताजी जुनघरे, निर्दोष ईश्वर रंगारी, सोनल सुरेश रायपुरे अशी बेपत्ता असलेल्या मुलांची नावे आहेत. सर्व मुले दहा वर्ष वयोगतील आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे ही दुदैवी घटना घडली आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. अद्याप मुलांचा शोध लागलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या तोहोगाव येथील प्रतिक नेताजी जुनघरे, निर्दोष ईश्वर रंगारी, सोनल सुरेश रायपुरे, आरुष प्रकाश चांदेकर ही चार मुले वर्धा नदी पात्रात पोहायला गेली.

ठाण्यात तलाव आणि रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाली कार

त्यापैकी आरुष प्रकाश चांदेकर हा घरी परत आला. त्याने तीन मित्र नदीत वाहून गेल्याचे गावात सांगितले. गावकऱ्यांनी लगेच नदीपात्राकडे धाव घेतली. नदी पात्रजवळ मुलांचे कपडे दिसून आले. त्यामुळे मुलं वाहून गेली असावी अशी शंका वाढली. मुलांच्या आई वडीलांनी एकच टाहो फोडला. पोलीस विभागाने घटनास्थळ गाठून शोध मोहीम सुरु केली आहे. अद्याप मुलांचा पत्ता लागलेला नाही. वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झालेली आहे. त्यामुळे शोध मोहिमेत अडथळा निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here