मंचर: राज्याच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी मोठा भूकंप झाला होता. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड करत शिंदे – फडणवीस सरकारसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर आज शरद पवार हे पहिल्यांदा छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात सभा घेण्यासाठी जात असताना त्यांच्यासोबत शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे देखील उपस्थित होते.
बंडानंतर शरद पवारांसोबत गाडीत बसले, चार दिवसात सोडली साथ; वाईचे आमदार मकरंद पाटील दादांच्या गटात
शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी अमोल कोल्हे यांच्या मोबाईलवर आंबेगाव तालुक्यातून व्हिडिओ कॉल आला होता. तीन वर्षांच्या चिमुकल्यांने “पवार बाबा की जय” म्हटल्यावर शरद पवार यांनी त्याला दाद देत स्मित हास्य केले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आंबेगाव तालुका हा दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे शरद पवार यांना धक्का बसला आहे.

संधी मिळत नाही म्हणून अजितदादांसारखा निर्णय घ्यावा लागतो, शिंदेंकडून कौतुक, फडणवीसही हसले!

मात्र आज त्याच आंबेगाव तालुक्यातून शरद पवार यांना चक्क व्हिडिओ कॉल करत जाहीर पाठिंबा दिल्याने या घटनेचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्याने आता चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक कार्यकर्ते सुरेश उर्फ अण्णा निघोट हे डॉ. अमोल कोल्हे यांचे सोशल मिडिया प्रमुख म्हणून आंबेगाव तालुक्यात काम करतात. त्यांनी दुपारी डॉ. कोल्हे यांना मोबाईलद्वारे संपर्क केला होता. त्यावेळी पवार हे नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना हा फोन आला होता. कोल्हे यांनी फोन केला आणि म्हणाले की, नमस्कार अण्णा, पवार साहेब बोलतात. साहेबांना पाहून सुरेश यांच्या आई ताराबाई हरिभाऊ निघोट भारावून गेल्या होत्या. काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे म्हणत जाहीर पाठिंबा देखील दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here