म. टा. प्रतिनिधी, पुणे : हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे पुढील दोन दिवस शहरातील पावसाचा जोर ओसरणार आहे. शहरात दिवसभर आकाश ढगाळ राहून हलक्या सरी, तर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे.

जून महिन्याच्या अखेरीस पुणेकरांनी संततधार पावसाचा अनुभव घेतला. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून आकाश ढगाळ असले तरी दिवसभरात अधून मधून पाऊस पडतो आहे. शनिवारी देखील दिवसभरात ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. सकाळी काही वेळासाठी आणि दुपारी काही भागात पावसाची सरी पडल्या. संध्याकाळी गार वारे सुटल्यामुळे हवेत गारवा होता. दिवसभरात कमाल २८.७ आणि किमान २२.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
बंडानंतर शरद पवारांसोबत गाडीत बसले, चार दिवसात सोडली साथ; वाईचे आमदार मकरंद पाटील दादांच्या गटात
दरम्यान, प्रतिकूल वातावरणामुळे पावसाला अद्याप सरासरी गाठणे शक्य झालेले नाही. शहरात ८ जुलैपर्यंत सरासरी २०५ मिमी पावसाची नोंद होते, या वर्षीच्या हंगामात आत्तापर्यंत १२३ मिमी पाऊस पडला आहे. पुण्यासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हिच परिस्थिती असल्याने अनेक ठिकाणी शेतातील पेरणीची कामे रेंगाळली आहे.
भारतात वर्ल्ड कप खेळण्यासाठी पाकिस्तानचे मोठे पाऊल, आता नेमकं काय केलं पाहा…
ताम्हिणीमध्ये ७९५ मिलिमीटर

पुणे शहरात गेल्या आठवड्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली असली तरी घाट माथ्यावर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. ताम्हिणीमध्ये गेल्या १ ते ८ जुलै या कालावधीत ७९५ मिलिमीटर पाऊस पडला. डुंगुरवाडी भागात ७५८, लोणावळ्यामध्ये ४५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. घाट माथ्याबरोबरच धरणक्षेत्रातही चांगला पाऊस पडला.

कोकण वगळता राज्याच्या बहुतांश भागात १६ जुलैपर्यंत पावसाची तूट राहणार आहे. प्रतिकूल घडामोडींमुळे येत्या ८ ते १२ जुलै दरम्यान राज्यात मान्सून सक्रीय नसेल. परिणामी येत्या काही दिवसांत पुणे शहरासह कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट तसेच मराठवाडा आणि विदर्भातील पावसाचा जोर कमी राहिले. मात्र १२ ते १३ जुलैदरम्यान पुन्हा तीन ते चार दिवस महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढेल, असं हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितलं आहे.
गुड न्यूज, दमदार पावसाचा इफेक्ट, मुंबईकरांचा पुढच्या दोन महिन्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला कारण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here