वाचा:
अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या नेत्यांनंतर आता यशोमती ठाकूर यांनी देखील यांनीच अध्यक्षपदासाठी पुढं यावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे. सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद सोडण्याची तयारी केल्यानंतर राहुल गांधी यांचं नाव अध्यक्षपदासाठी पुढं आलं आहे. मात्र, त्यावरून पक्षात दोन गट पडले आहेत. एका गटाने अप्रत्यक्षपणे राहुल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पक्षाचा अध्यक्ष गांधी कुटुंबाबाहेरचा असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यात प्रामुख्यानं ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. तर, पक्षातील तरुण फळी राहुल गांधी यांच्या बाजूने ठामपणे उभी राहिली आहे.
गांधी कुटुंबातील व्यक्ती पक्ष व देश व्यवस्थित सांभाळू शकते, असं मत बहुतांश नेत्यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं सोनिया गांधी यांनीच अध्यक्षपद साभाळावे किंवा राहुल यांनी पुढे यावे, असं या नेत्यांचं मत आहे. यशोमती ठाकूर यांनीही तोच सूर आळवला आहे. ‘गांधी हे केवळ कुटुंब नाही, तो भारताचा ‘डीएनए’ आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे. सोनियांनी अध्यक्षपद सोडण्याचा निश्चयच केला असेल तर राहुल यांनी पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी पुढं यावं. भारताला राहुल गांधींची गरज आहे,’ असंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी भारतीय काँग्रेस, राहुल गांधी, प्रियांका गांधी, वेणुगोपाल, राजीव सातव व बाळासाहेब थोरात यांना टॅगही केलं आहे.
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
Thank you ever so for you article post.
A big thank you for your article.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.