याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रदीप यांचे निवृत्तीचे सहा महिने शिल्लक असल्याने पेंशनकरिता लागणाऱ्या कागदपत्रांची ते जमवाजमव करत होते. यासाठी ते एक महिन्याची सुट्टी घेऊन गावी आले होते. आपली सर्व कामे आटोपून आणि नातलगातील लग्नसोहळा पार पाडून सुट्टी संपण्याआधी ते गावावरून परतवाडाकडे परतत होते. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी आणि दोन्ही मुले होती.
पत्नी आणि मुलांना ऑटोरिक्षात बसवून प्रदीप स्वत:च्या मोपेड गाडीवरून (एम एच २७.सी.जी. ८३९६) परतवाडाकडे जात असताना विरुध्द दिशेने येणाऱ्या (जी जे.डी. 3. एक्स टी .९६८२ ) क्रमांकाची भरधाव अनियंत्रित चारचाकी वाहनाने जबर धडक दिल्याने प्रदीप यांचा घटनस्थळी मृत्यू झाला. चारचाकी चालक प्रमोद शंकर धुर्वे (रा. पाडोडी तह, भैसदेही निबैतूल) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदीप यांची आर्थिक परिस्थिती एकदम हलाखीची होती. त्यात प्रदीप यांनी देश सेवेचे स्वप्न उराशी बाळगत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सन फार्मा २००१ मध्ये शिक्षण सोडून सैन्यात दाखल होत २२ वर्ष देश सेवा केली. देशसेवा बजावत असताना त्यांनी लद्दाखसह देशाच्या अनेक भागात आपले कर्तव्य बजावले. शनिवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रदीप यांना अखेरचा निरोप देण्यासाठी २४ मराठा बटालियन पुणेचे सुभेदार, सह जवान सैनिक फेडरेशन महाराष्ट्र सचिव विरजराजे सातपुते, बहादूर माजी सैनिक झानेसर भुजबळ, सुभेदार हरिहर भातकुले, भास्कर काडोडे, स्याम अकोलकर, नीलेश रांगोळे, रामेश्वर ढाकुलकर, श्रीहरी बागडे, रावसाहेब दातिर सुभेदार नरहरी भिड़कर, जिल्हा सैनिक कार्यालय अमरावती चे कर्मचारी यांनी मानवंदना दिली.
स्थानिक पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रशांत गीते, उपनिरीक्षक अमोल मानतकर, सहकर्मचारी यांनी मानवंदना दिली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी सोनु कांडलकर, योगेश पवार सह संपूर्ण गावकरी व गणमान्य नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.