सोमवारी प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात आपलं उत्तर दाखल केलं. ‘आजच्या चिंताग्रस्त क्षणी भारताच्या लोकांची कशावर आशा असेल तर ती सर्वोच्च न्यायालायावर आहे. ती देशातील निरंकुश व्यवस्थेसाठी नाही तर देशात कायदे व्यवस्था आणि संविधान प्रस्थापित राहवं यासाठी… त्यामुळे जेव्हा गोष्टी आपला मार्ग भटकताना दिसतात तेव्हा आपण बोलातं. या न्यायालयातून मिळालेल्या जबाबदारीची जाणीवच आपल्याला हे विशेष कर्तव्य देते. माझी वक्तव्य सद्भावनापूर्ण होते. मी सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशांना निशाणा बनवण्यासाठी टिप्पणी केली नव्हती. ती माझी होती’ असं त्यांनी आपल्या उत्तरात म्हटलंय.
गुरुवारी सर्वोच्च न्यायालयानं प्रशांत भूषण यांना विनाअट माफी मागण्याचे आदेश दिले होते. अन्यथा सहा महिन्याचा तुरुंगवास, दोन हजार रुपयांचा दंड किंवा दोन्हीही शिक्षेचा इशारा दिला होता. यावेळी, न्यायालयाकडून देण्यात येणाऱ्या कोणत्याही शिक्षेसाठी तयार आहोत, परंतु मी माफी मागणार नाही, अशी भूमिका प्रशांत भूषण यांनी घेतली होती.
संबंधित बातम्या :
वाचा :
वाचा :
वाचा :
न्यायपालिकेचा अवमान?
ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी न्यायपालिका आणि सरन्यायाधीशांविरुद्ध जून २०२० मध्ये दोन ट्विट केले होते. ‘माजी १६ सरन्यायाधीशांमध्ये निम्म्याहून अधिक सरन्यायाधीश भ्रष्ट होते’ असं या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं होतं. तसंच त्यांनी काही न्यायाधीशांवर टीकाही केली होती. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठानं प्रशांत भूषण यांना दोषी करार दिलंय.
अनेक वकिलांचं समर्थन
उल्लेखनीय म्हणजे, २४०० हून अधिक भारतीय वकिलांनी प्रशांत भूषण यांच्या समर्थनार्थ ऑनलाईन याचिका दाखल केलीय. तसंच, आज महाराष्ट्रातील पुण्यातही अनेक वकील प्रशांत भूषण यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले दिसले. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवाराबाहेर वकिलांनी काळ्या फिती बांधून भूषण यांच्याविरोधातील कारवाईचा निषेध केला.
इतर बातम्या :
वाचा :
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.