नांदेड : गर्भवती महिलांची सोनोग्राफी करुण त्यांना परत घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या अपघातात आठ गर्भवती महिला जखमी झाल्याची माहिती आह . जिल्ह्यातील मुखेड – बाऱ्हाळी रोड वरील कोत्तलवार ऑइल शोरूम जवळ अपघात घडला आहे. जखमी महिलांवर मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

मुखेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलांची तपासणी केली जाते. शनिवारी मुखेड तालुक्यातील आठ गर्भवती महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आणले होते. त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णवाहिकेने सोनोग्राफीसाठी मुखेड शहरातील आराध्या सोनोग्राफी सेंटर येथे नेण्यात आले. सोनोग्राफी केल्यानंतर परत त्यांना रुग्णवाहिकेने नेलं जातं होतं. मुखेड – बाऱ्हाळी रोड वरील कोत्तलवार ऑइल शोरूम जवळ येताच रुग्णवाहिका आणि नगरपरिषदेच्या घंटागाडी वाहनाची समोरासमोर धडक झाली.
संकटात पवारांसाठी एकवटले जुने मित्र… अन् येवल्यात इतिहास रचला, बंडाचा बदला घेण्याच्या निर्धारानं उभे राहिले
अपघातानंतर रुग्णवाहिकेत असलेल्या शकुंतला ज्ञानेश्वर राजुरे (वय २२ कोळनूर), अश्विनी अनिल शिंदे (वय २० हसनाळ), निकिता दत्तात्रय शिंदे (वय २४ हसणाळ), संगीता शिवराज टंकम्पले (वय २५ हसणाळ), अनुसया श्रीनिवास बोईनवाड ( वय २४ कोळनुर), संध्याराणी चंद्रकांत थोटवे (वय २० हसनाळ), रोशनी रत्नदीप कांबळे (वय २२ कोळनुर), राजश्री खुशाल इंगोले (वय २० हसनाळ) इत्यादी गर्भवती महिला जखमी झाल्या. जखमी महिलांना तात्काळ मुखेडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान देखील झाले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे
Nashik: ‘टीचर ऑफ द मिलेनियम’ ओळख असणारे डॉ. मो. स. गोसावी काळाच्या पडद्याआड

वाहन चालकांचा निष्काळजी पणा वाढला

नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे झाली आहे. सर्वत्र सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांचा निष्काळजीपणा वाढला आहे. वाहन चालकाकडून भरधाव वेगाने गाडी चालवली जातं आहे. त्यांच्या या निष्काळजी पणामुळे मोठे अपघात देखील घडत आहेत. त्यामुळं वाहनधारकांनी वाहन चालवताना शिस्त बाळगण्याची गरज आहे. तर, वाहतूक पोलिसाकंडून देखील अपघाताचं प्रमाण करण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Sharad Pawar : शरद पवार की छगन भुजबळ, नाशिकमध्ये कुणी मारली बाजी, येवल्यात काय घडलं?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here