दोन नाग एकमेकांत अडकलेले आढळून आले असे रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेलफेअरचे महेश इथापे यांनी सांगितले. तसेच या दोन नागांपैकी एक नाग हा मेलेला आढळून आला. त्यामुळे आम्ही जिवंत असलेल्या आणि पूर्णपणे वाढ झालेल्या नागाची प्राथमिक साफसफाई करून पशुवैद्यकांकडे नेले असे इथापे यांनी सांगितले.
डांबर गरम होते आणि त्यात हे नाग बुडाले होते असे इथापे यांनी सांगितले. ज्या लोकांना वन्यजीव संकटात सापडलेले दिसतात त्यांनी तात्काळ वन्यजीव संरक्षणकर्ते किंवा वन्यजीव विभागाला फोन करावा असे आवाहन रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफचे अध्यक्ष पवन शर्मा यांनी केले. जखमी कोब्राला विक्रोळीतील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले, यानंतर त्याला तेल आणि निर्जंतुकांच्या साह्याने स्वच्छ करण्यात आल्याचे डॉ. प्रीती साठे यांनी सांगितले तसेच तो कोब्रा गरम डांबरात अडकल्याचं सांगण्यात आलं.
जेव्हा हा नाग रस्त्यावरील डांबरात अडकला होता त्यावेळी डांबर गरम असण्याची जास्त शक्यता असल्याचे डॉ. साठे यांनी स्पष्ट केले. त्याच्या शरीरावरील काही ठिकाणी फोड आले होते तसेच, त्या जखमांमध्ये गेलेले गरम डांबर बाहेर काढल्याचे डॉ. साठे यांनी सांगितले. कोब्रा नागाने या उपचारांना प्रतिसाद दिला असून लवकरच तो यातून बरा होईल असे डॉ. साठे यांनी सांगितले आहे.