नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड झाल्यापासून देवळालीच्या आमदार सरोज अहिरे चर्चेत आहेत. अजित पवारांनी बऱ्यापैकी आमदारांना आपल्या गटात खेचत शरद पवारांना मोठा धक्का दिला. अजित पवारांच्या बंडावेळी काही आमदारांनी अजित पवार गटात लगेच न जाता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. या तटस्थ आमदारांच्या यादीत सरोज अहिरे यांचा समावेश आहे.

सध्या अहिरे या प्रकृती बरी नसल्याने रुग्णालयात दाखल असून त्या उपचार घेत आहेत. नुकतीच सुप्रिया सुळे यांनी सरोज अहिरेंची रुग्णालयात भेट घेतली होती. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुळे यांनी सरोजताई माझ्या बहीण आहेत आणि जेव्हा आपल्या कुटुंबातील व्यक्ती दवाखान्यात असते तेव्हा त्या व्यक्तीची विचारपूस करणं माझी जबाबदारी आहे.

जनता म्हटली कामे नको तर साहेबांबरोबर जाईल, विकासकामे म्हटली तर दादांसोबत जाईल : सरोज अहिरे

हे नातं प्रेमाचं आहे यात राजकारण येत नाही. सध्या त्या रुग्णालयात आहेत आधी त्यांना बरं होऊद्या नंतर त्यांच्याशी राजकीय चर्चा करता येईल असे सुळे यांनी सांगितले होते. सुळे यांच्या भेटीनंतर आता अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनीही सरोज अहिरे यांची रुग्णालयात भेट घेतली आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. नुकतीच शरद पवार गटाच्या दोन आमदारांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार गटाची वाट धरली आहे.

दरम्यान, सरोज आहिरे यांनी आपली भूमिका अद्यापही जाहीर केलेली नाही. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तटस्थ आमदार आहे. यावर विचारले असता, ‘सरोज आहिरे या दोन दिवस अजितदादा यांच्या बंगल्यावर होत्या. त्यांनी सह्या वगैरे केल्या आहे,’ अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच त्यांची तब्येत बरी नसणार, म्हणून त्या नॉट रिचेबल झाल्या होत्या, असे देखील छगन भुजबळ म्हणाले.

साहेबांची साथ सोडताना माझ्यासमोर मोठा पेच, पण…; वळसे पहिल्यांच बोलले, ईडीबाबत म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here