मुंबईः मुंबईसह राज्यातील पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढतच असून, त्यामुळे पोलिस दलासह त्यांच्या कुटुंबीयांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या २४ तासांत १२० पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळं राज्यातील पोलिस दलातील करोनाबाधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १३ हजार ७१६ इतकी झाली आहे. करोनामुळं आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १३९ इतकी झाली आहे. तर एक पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

राज्यात करोनाबाधित पोलिसांमध्ये १४५६ अधिकारी आणि १२ हजार २६० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दररोजचा बंदोबस्त, तपासणी, चेकनाक्यावरील ड्युटी अशा विविध कामांत अडकून पडलेल्या पोलिसांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. राज्यात आत्तापर्यंत १३ हजार ७१६ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे तर, दोन हजार ५२८ अॅक्टिव्ह पोलिस असून त्यातील ३३१ अधिकारी आणि २ हजार १९७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

करोनाच्या या लढ्यात ११ हजार ०४९ पोलिस कर्मचाऱ्यांनी मात केली आहे. यामध्ये ९ हजार ९३९ पोलिस कर्मचारी आणि १ हजार ११० अधिकारी करोनामुक्त झाले आहेत. लॉकडाउनमध्ये लागू करण्यात आलेल्या नियमावलीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना करोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. पोलिसांमधील करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पोलिस प्रशासनानं काही उपाययोजनाही आखल्या आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये तैनात असलेल्या पोलिसांना ड्युटीनंतर दोन ते तीन दिवसांची सुट्टी देण्यात येत आहे. जेणेकरून त्यांना आराम करण्यास वेळ मिळेल, असं पोलिस दलातील अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

8 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

  2. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here