बीड : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी अंधारेंवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यभरातील कला केंद्र चालक सुषमा अंधारे यांच्या संपर्कात आहेत. पोलीस कारवाई होऊ नये, यासाठी मदत करण्याची गळ घालतात. या ठिकाणी चालणाऱ्या गैर प्रकारांना सुषमा अंधारे यांचे पाठबळ आहे. आणि या सर्व प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांचे विभक्त पती तथा शिंदे गट शिवसेनेचे राज्य समन्वयक वैजनाथ वाघमारे यांनी केली आहे.
धनंजय मुंडेंच्या सत्तेतील सहभागाने पंकजांची गोची; परळी सोडून दुसरा मतदारसंघ शोधण्याची नामुष्की?
केज येथे शिवसेना जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या भागीदारीत चालवल्या जाणाऱ्या कला केंद्रावर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी धाड टाकली होती. या ठिकाणी अल्पवयीन मुलींचे शोषण केले जात असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर वैजनाथ वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. रत्नाकर शिंदे यांना जिल्हाप्रमुख करण्यासाठी सुषमा अंधारे यांनी २५ लाख रुपये घेतले. तसेच कला केंद्र तू चालव मी आहे. पोलीस कारवाई होऊ देत नाही, असं म्हणत सुषमा अंधारेंनी पाठबळही दिले. यामुळेच रत्नाकर शिंदे हे बळीचा बकरा बनले, असा गंभीर आरोप वैजनाथ वाघमारे यांनी केला आहे.
एचआयव्हीग्रस्त मुलांना शाळेत सापत्न वागणूक; कोंडून ठेवल्याचाही आरोप, शाळेत येण्यासही मज्जाव
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सुषमा अंधारे यांचे मोठे वजन निर्माण झाले आहे. परंतु कला केंद्राच्या माध्यमातून चालणाऱ्या गैरप्रकारांना पाठबळ देणाऱ्या अशा महिलेची पक्षातून ठाकरेंनी हाकालपट्टी करावी, अशी मागणी वैजनाथ वाघमारे यांनी यावेळी केली.

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना एका बॉलमध्ये आऊट केलं | रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here