नवी दिल्ली :लॉकडाउनमुळे , , पीयूसी यांच्या नूतनीकरणाची चिंता भेडसावणाऱ्या सर्वसामान्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायदा-१९८८ आणि केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी किंवा इतर कागदपत्रांना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

मंत्रालयाने यापूर्वी ३० मार्च आणि ९ जून रोजी मोटार वाहन कायदा-१९८८ आणि केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत मुदतवाढीची सूचना प्रसिद्ध केली होती. त्यात फिटनेस, परमिट (सर्व प्रकार), परवाना, नोंदणी किंवा इतर संबंधित कागदपत्रांची वैधता ३० सप्टेंबर २०२० असल्याचे सांगितले होते.

देशभरातील कोविड-१९ संक्रमण परिस्थिती पाहता,वाहन परवाना आणि इतर कागदपत्रे ज्यांची वैधता १ फेब्रुवारी २०२० रोजी संपली आहे किंवा ३१ डिसेंबर २०२० रोजी संपणार आहे, त्या सर्वांना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अंमलबजावणी अधिकाऱ्यांना अशी कागदपत्रे ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वैध असल्याचे सांगण्यात आले आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या या निर्णयाने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या याआधी काढलेल्या आदेशानुसार, मोटार वाहनांशी संबंधित लायसन्स, वाहन योग्यता (फिटनेस) प्रमाणपत्र, वाहन परवाना, नोंदणीकरण १ फेब्रुवारी किंवा त्यानंतर संपत असतील ते ३१ जुलैपर्यंत वाढवली होती. त्यानंतर ती ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली. लॉकडाउन काळात ज्या वाहनचालकांना वाहन नोंदणी आणि अन्य संबंधित कामांसाठी शुल्क भरता आले नाही, अशा १ फेब्रुवारीनंतरच्या सर्व वाहनचालकांकडून विलंब शुल्क आकारण्यात येऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here