राहुल गांधींचे आरोप
राहुल गांधींनी केलेले आरोप गुलाम नबी आझाद यांना जिव्हारी लागले आहेत. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या आझाद यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. भाजपशी साटंलोटं असल्याचे आरोप सिद्ध झाले तर राजीनामा देईन, असं आझाद म्हणाले.
ओवैसींची आझादांवर टीका
हैदराबादमधून एमआयएमचे खासदार असलेल्या असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विंट करत गुलाम नबी आझाद यांच्यावर निशाणा साधला. काव्यगत न्याय, गुलाम नबी साहेब असेच आरोप माझ्यावरही करण्यात आले होते. आता तुमच्यावरही तेच आरोप केले गेलेत. ४५ वर्षांची वर्षांची गुलामी फक्त यासाठी होती? जनेऊधारी नेतृत्वाला कुणीही विरोध केला तर त्याला भाजपची बी-टीम म्हणून हिणवले जाते. यामुळे काँग्रेसमध्ये कितीही प्रामाणिकपणे काम केलं तरी मुस्लिम नेत्यांवर अन्याय होतोच. हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे, असं ओवैसी म्हणाले.
गुलाम नबी आझाद हे आम्हाला भाजपची बी-टीम म्हणून हिणवत होते. आता त्यांच्या पक्षाचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुलाम नबी आझादांवर भाजपशी संगनमत साधल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसमध्ये असलेले मुस्लिम नेते आपला फुकट वेळ घालवत आहेत. किती काळ काँग्रेस नेतृत्वाचे गुलाम म्हणून राहिलं पाहेज, याचा या मुस्लिम नेत्यांनी केला पाहिजे, असं ओवैसी म्हणाले.
आझाद यांचे स्पष्टीकरण
दरम्यान, आपण भाजपच्या संगनमतातून सोनिया गांधींना पत्र लिहिले असं राहुल गांधी बोलले नाहीत. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतही ते म्हणाले नाहीत आणि बैठकीच्या बाहेरही ते असं काही बोलले नाही, असं स्पष्टीकरण काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपशी संबंध असल्याच्या आरोपावरील वादावर दिलं आहे.
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत दिसला तणाव
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये तनातनी झाली. पक्षाचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी गुलाम नबी आझाद यांच्यासह इतर नेत्यांना पत्र लिहिण्याच्या कारणावरून सुनावलं. सोनियांना पत्र लिहिण्याच्या टायमिंगवरून राहुल गांधी यांनी भाजपशी संगनमत असल्याचा आरोप नेत्यांवर केला. वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना हा आरोप जिव्हारी लागला. तर आपल्या पक्ष निष्ठेवर प्रश्न उपस्थित झाल्याने कपिल सिब्बल यांनी खेद व्यक्त केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times