सातारा : फलटण शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील हणमंतराव पोतेकर व अमित पोतेकर या पितापुत्रांनी रात्री कुटुंबासमवेत जेवण केले. त्यानंतर नेहमीप्रमाणे सर्वांनी आयुर्वेदिक काढा प्यायला. त्यानंतर सर्वजण झोपी गेले. मात्र अचानक मध्यरात्रीच्या सुमारास हणमंतराव व त्यांचा मुलगा अमित आणि मुलीला त्रास जाणवू लागला. रात्रीत तिघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पितापुत्राचा मृत्यू झाला.

याबाबत माहिती अशी की , सातारा जिल्ह्यातील फलटण शहरातील हणमंतराव पोतेकर व अमित पोतेकर या पितापुत्रांचा आकस्मित मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण फलटण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. अद्याप मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कारण स्पष्ट होणार आहे.

Maharashtra Weather: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या; हवामान विभाग म्हणतं…

फलटण शहरात गजानन चौक येथे राहणारे हणमंतराव रामभाऊ पोतेकर (वय ५५) व त्यांचा एकुलता एक मुलगा अमित पोतेकर (वय ३२ ) यांनी रात्री कुटुंबासमवेत जेवण केले. त्यानंतर आयुर्वेदिक काढा सर्वांनी प्यायल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास हणमंतराव व त्यांचा मुलगा अमित, मुलगी अशा तिघांना त्रास होऊ लागला. त्यांना रात्रीत शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच पहाटे हणमंतराव पोतेकर व त्यानंतर १५ मिनिटांनी अमित पोतेकर यांचे निधन झाले.

राजकारणाचा चिखल झालाय; अजित दादांच्या भूमिकेबद्दल शेतकऱ्यांचं स्पष्ट मत

दरम्यान, हणमंतराव यांच्या मुलीची तब्येत सुधारली असून, या पितापुत्रांचा नक्की मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण समजू शकलेले नाही. विषबाधेमुळे मृत्यू झाला की अन्य कोणत्या कारणामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल. या पितापुत्रांच्या आकस्मित मृत्यूने संपूर्ण फलटण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here