म.टा. प्रतिनिधी, नागपूर : वडिलांच्या वाढदिवशीच मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील ब्राह्मणी येथे घडली. अथर्व सूरज हिवराळे (वय ७) असं मृतकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अथर्व हा मित्रांसह घरासमोर खेळत होता. मोटारसायकलने (एमएच-४०-सीएल-८६४०) त्याला धडक दिली. सुमारे २० फुटांपर्यंत अथर्वला फरफटत नेल्याने त्याच्या डोक्याला मार लागला. शेजाऱ्यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी अथर्वला नागपुरात हलविण्यास सांगितले. नागपुरात आणताना त्याचा मृत्यू झाला. कळमेश्वर पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून चालक भूषण चांभारे याला अटक केली. शोकाकुल वातावरणात अथर्वच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोठी बातमी: भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र, मंत्रिमंडळातून चौघांना डच्चू, कोणत्या भागातील मंत्र्यांचा समावेश?
अपघातात वडील, मुलगी जखमी

बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचभुवन चौकात दुचाकीने (एमएच-१५-एचई-६०६८) या क्रमांकाच्या मोटारसायकलला धडक दिल्याने वडील आणि मुलगी जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. तौफिक गनी शेख (वय ३६) व त्यांची मुलगी आरोबी (वय ४, दोन्ही रा. मनीषनगर) अशी जखमींची नावे आहेत. दोघांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर चालक मोटारसायकलसह पसार झाला. बेलतरोडी पोलिसांनी गंभीर अपघाताचा गुन्हा दाखल करून चालकाचा शोध सुरू केला आहे.

Maharashtra Weather: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या; हवामान विभाग म्हणतं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here