मुंबई: राज्यपाल यांनी शिवसेना सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पीए आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. राज्यपाल कोश्यारी थेट नार्वेकरांच्या घरी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात त्यामुळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

मिलिंद नार्वेकर हे पालीहिल येथे राहतात. त्यांच्याच इमारतीत कृपाशंकर सिंह ही राहतात. राज्यपाल कोश्यारी हे नार्वेकर यांच्या घरी जाणार असल्याची माहिती बाहेर पडणार नाहीत याची काळजी घेण्यात आली होती. त्यामुळेच राज्यपालांनी सकाळीच जाऊन नार्वेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन गप्पा मारल्या. मात्र, या भेटीची माहिती गोपनीय राहू शकली नाही.

गेल्या काही दिवसांपासून नार्वेकर यांच्या राजभवनावरील भेटी वाढल्या होत्या. राजभवन आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात समन्वय साधण्याचं काम नार्वेकर यांनी केलं होतं. नार्वेकर हे राज्यपाल कोट्यातील विधान परिषदेच्या एका जागेसाठी इच्छूक आहेत. पदवी आणि पदव्युत्तर परिक्षेच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि राज्यपालांमध्ये वादाची ठिणगी उडाली होती. मुख्यमंत्री परिक्षा घेत नसल्याबद्दल कोश्यारी यांनी जाहीर मतही व्यक्त केलं होतं. त्यामुळे ठाकरे हे राज्यपालांची भेट घेणे टाळत होते. असं एका शिवसेना नेत्यानं सांगितलं. तर कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेसला कधीच सोडचिठ्ठी दिली आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, भाजपमध्ये प्रवेश नाही मिळाला तर ते पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here