म.टा. वृत्तसेवा, वर्धा : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सला भीषण अपघात होऊन २५ प्रवाशांचा नाहक बळी गेला. यात वर्धा जिल्ह्यातील १४ जणांचा समावेश आहे. स्थानिक शांती भवनात मृतकांच्या कुटुंबीयांनी रविवारी बैठक घेत ट्रॅव्हल्स चालकाप्रमाणे मालकावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

विदर्भ ट्रॅव्हल्सचा १ जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर अपघात झाला. या ट्रॅव्हल्समध्ये सावंगी मेघे चौपाटीवरून पुणे येथे जाण्यासाठी जिल्ह्यातील १४ प्रवासी बसले होते. या ट्रॅव्हल्सच्या चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या घटनेला मालकही तेवढाच जबाबदार असल्याचा आरोप मृत प्रवाशांच्या कुटुंबीयांनी बैठकीत केला.
ना हर्षद मेहता, ना झुनझुनवाला पहिल्या बिग बुलचे नाव माहिती आहे का? दीडशे वर्षांपूर्वी केलेली लाखोंची कमाई
विदर्भ ट्रॅव्हल्सची मान्यता रद्द करावी, वाहनाची गती बांधलेली असावी, खासगी वाहनाचे नियम अधिक कडक करावेत, समृद्धी महामार्गावर शंभर ते दीडशे किमीचा प्रवास झाल्यानंतर थांबा अनिवार्य करावा, ट्रॅव्हल्सचे तिकीट रद्द करण्याची पॉलिसी देण्यात यावी, ट्रॅव्हल्समालकावर गुन्हा दाखल करून त्यास तत्काळ अटक करावी, नागपूर ते पुणे रेल्वेगाड्यांची संख्या वाढवावी, अपघाताच्या संपूर्ण प्रकरणासाठी चौकशी समिती नेमून पीडितांना न्याय द्यावा, प्रत्येक कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, आदी मागण्या या बैठकीत करण्यात आल्या.
मनसेच्या ‘त्या’ नेत्याचा मोठा निर्णय, पक्षातील सर्व पदं सोडली पण राज ठाकरेंना दिला शब्द, म्हणाला…

चालक नशेत असल्यानं अपघात?

नागपूरहून निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा येथे अपघात झाला होता. त्या बसमध्ये नागपूर, यवतमाळ आणि वर्धा येथील प्रवासी होते. ती बस पुण्याहून नागपूरला निघाली होती. त्या अपघातात नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि पुणे जिल्ह्यातील प्रवाशांचा मृत्यू झाला होता. विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा अपघात झाल्यानंतर ती पेटली होती. यामुळं २५ जणांचा मृत्यू झाला होता. पोलीस तपासात आणि फॉरेन्सिकच्या अहवालातील माहितीनुसार बसचालकानं त्या दिवशी मद्यप्राशन केलं असल्याचं समोर आलं आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची ती बस एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावावर होती. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी पीयूसी प्रमाणपत्र देण्यात आल्याचा प्रकार देखील घडला होता. त्यानंतर संबंधित पीयूसी सेंटरची मान्यता रद्द करण्यात आली होती.

मोठी बातमी: भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र, मंत्रिमंडळातून चौघांना डच्चू, कोणत्या भागातील मंत्र्यांचा समावेश?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here