नागपूर : नागपुरात एक खळबळजनक घटना घडली आहे. एका १४ वर्षीय मुलाने टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या लालगंज झाडे चौक येथे ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. वेद रितेश केळवदकर असं मृत मुलाचे नाव असून तो दहावीच्या वर्गात शिकत होता. क्लासला जात नसल्याने वडिलांनी त्याला रागावले असता आणि त्याचासोबत वडिलांनी बोलणेही बंद केले. यामुळे अस्वस्थ झालेल्या वेदने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेद दहावीत शिकत होता. वेदचे वडील हे खासगी नोकरी करतात तर आई गृहिणी आहे. दहावीत असल्याने त्याच्या वडिलांनी त्याला क्लास लावून दिले होते. मात्र, वेद हा अधुन मधुन क्लासला दांड्या मारत होता. आता सलग तीन दिवस तो क्लासला गेला नाही. हा प्रकार त्याच्या वडिलांना कळताच वडिलांनी त्याला अनेकदा समजावून सांगितलं. अनेवेळा समजाऊनही वेद हा क्लासमध्ये दांड्या मारतच होता. अखेर त्याच्या वडिलांनी त्याच्याशी बोलणे बंद केले. वडील काही बोलत नसल्याचा वेदच्या मनावर परिणाम झाला. काल रविवारी घरी कोणी नसल्याचे पाहून वेदने घराचा वरच्या माळ्यावर त्याने दुपारी दीडच्या सुमारास सळईला टॉवेल बांधून गळफास घेतला.

मोठी बातमी: भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र, मंत्रिमंडळातून चौघांना डच्चू, कोणत्या भागातील मंत्र्यांचा समावेश?
कुटुंबातील सदस्य परतल्यावर घरी कोणी दिसत नसल्याने नातेवाईकांनी वरच्या खोलीत जाऊन पाहिलं असता, नातेवाइकांनी त्याला लटकलेलं पाहिलं. नातेवाइकांनी वेदला खाली उतरवून मेयो रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. वेदच्या मृत्यूमुळे केळवदकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात दुःखाचे वातावरण पसरलं आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

मनसेच्या ‘त्या’ नेत्याचा मोठा निर्णय, पक्षातील सर्व पदं सोडली पण राज ठाकरेंना दिला शब्द, म्हणाला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here