मोहम्मद इम्तियाज केम्मानू हे श्री क्षेत्र धर्मस्थळ रुरल डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या शौर्य डिजास्टर मॅनेजमेंट टीमचे सदस्य आहेत. त्यांचं वय ४४ वर्ष असून कायकिंगच्या द्वारे त्यांनी आतापर्यंत २५० हून अधिक जणांचे प्राण वाचवले आहेत.
उडपी जिल्ह्यातील नित्तूर मध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस असल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. इम्तियाज यांनी टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना प्रामुख्यानं रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न करतो, असं म्हटलं. रुग्णांनतर, वयस्कर व्यक्ती, महिला आणि मुलांना वाचवतो, असं म्हटलं.
कोडणकूर वॉर्ड प्रतिनिधीचा ६ जुलै रोजी सकाळी ७ वाजता फोन आला होता. त्याद्वारे मदत मागण्यात आली होती. इम्तियाज यांनी सांगितलं की ते कायक घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरु केलं. नित्तूरमध्ये त्यांनी बचावकार्य सुरु केलं आहे. कोडणकूरमध्ये जे अडकले होते त्यांच्यासह थाराकट्टे, केम्मान्नू, कोडावूर, नित्तूरमध्ये पुढचे दोन दिवस बचाव कार्य केल्याचं इम्तियाज यांनी सांगितलं.
इम्तियाज यांनी एका वयस्कर व्यक्तीला देखील कायकिंगद्वारे वाचवलं. त्या व्यक्तीला उठता देखील येत नव्हते. तब्येत बरी नसल्यानं ते झोपून होते. त्यामुळं पूरस्थितीच्या काळात त्यांना घराबाहेर पडता येत नव्हतं. लोक ज्यावेळी मदतीसाठी फोन करतात त्यावेळी मदत करतो.