मुंबई: या सरकारचा पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीनी दिली आहे. १७ जुलैपासून पावसाळी अधिवेशन होणार असल्याने या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात आपले नाव असेल का, याची उत्सुकता शिवसेना भाजप नेत्यांमध्ये पहिला मिळत आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ९ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतल्याने आता पालकमंत्री पदाची माळ गळ्यात पडते की नाही, याची वाटत बघत आहेत. या मंत्रिमंडळात १४ मंत्र्याचा समावेश होणार असल्याची माहिती भेटत आहे. सध्याचा सरकारमध्ये तीन पक्ष असल्यानी शिवसेना आणि भाजपमधील काही आमदारांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार आहे. त्यामुळे कदाचित विस्तार लांबणीवर जात आहे.

मोठी बातमी: भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र, मंत्रिमंडळातून चौघांना डच्चू, कोणत्या भागातील मंत्र्यांचा समावेश?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील चार ते पाच आमदारांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. यात मराठवाड्यातील मंत्र्यांचा कामावर केंद्रातील नेते नाराज असल्याची माहिती मिळत आहे. या नेत्यांना होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारातून डच्चू देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या समोरील पेच वाढताना दिसत आहे कदाचित या पेचामुळे महाराष्ट्रातील मंत्रिमंडळचा विस्तार रखडलेला पाहायला मिळत आहे. त्यातच एकनाथ शिंदे बरोबर आलेल्या ४० आमदारांमध्ये मंत्रीपदावरवरुन रस्सीखेच चालू आहे. त्यातील काही आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर दबाव वाढलेला दिसत आहे.

शरद पवारांना ‘सैतान’ म्हणणाऱ्या सदाभाऊंना रुपाली चाकणकरांनी झापलं, म्हणाल्या, ‘कुवत बघून बोला’

राष्ट्रवादी पक्ष सरकारमध्ये सामील होणापूर्वी शिंदे आमदारांना १२ ते १३ मंत्रिपद आणि महामंडळ भेटण्याची शक्यता होती. मात्र, ही शक्यता देखील आत्ता धूसर झालेली आहे, हे आमदारांना कळून चुकले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेचा गटात मोठया प्रमाणात नाराजी दिसत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेऊन आठवडा उलटून गेला आहे. मात्र त्यांना देखील अजून खाती देण्यात आलेली नाहीत. आता आपल्या पक्षातील आमदारांची समजूत काढण्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यशस्वी होतात का? हे या आठवड्यात महाराष्ट्रातील जनतेला समजेल. मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य करताना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले. अजित पवारांबरोबर आठ मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, अजून खातेवाटप होऊ शकले नाही. खरंतर शपथ घेतल्यानंतर २४ तासात खातेवाटप करण्याची परंपरा आहे. अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे असे टोलेजंग आठ दिवस खाते वाटपशिवाय बसले आहेत. यावरुन विरोध त्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून हिणवत आहेत. मात्र, शिवसेनेच्या विद्यमान चार मंत्र्यांना डच्चू मिळाल्यास शिंदे गटात त्याचे काय पडसाद उमटणार आणि एकनाथ शिंदे पुढे काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारमध्ये क्षमता नाही, मंत्रिमंडळ विस्तार 2024 नंतरच होणार – बच्चू कडू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here