मुंबई : राष्ट्रीय अध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गोंधळावर भाजपचे खासदार यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसकडे आज हवं तसं नेतृत्व नाही. काँग्रेसची अवस्था एक ना धड भाराभर चिंध्या अशी झाली आहे, अशी टीका करतानाच काँग्रेसच्या अध्यक्षपदावर एकमत होणं कठीण आहे, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. काँग्रेसच्या कार्यपद्धतीला नेते कंटाळले आहेत. त्यामुळेच पत्रं पाठवून नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी बैठक सुरू आहे. पण अद्यापही कुणाच्याच नावावर एकमत होताना दिसत नाही. राहुल गांधीही काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारायला तयार नाहीत आणि दुसऱ्या नावाची कोणी शिफारस करतानाही दिसत नाही, असं सांगतानाच आज देशात काँग्रेसची परिस्थिती अत्यंत कठिण आहे. आज हवं तसं नेतृत्व काँग्रेसकडे नाही. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदावर एकमत होणं कठीण आहे, असं नारायण राणे म्हणाले.

काँग्रेसच्या बैठकीत अध्यक्षपदावर जेवढे वाद होतील. तेवढं काँग्रेसचं खच्चीकरण होईल. नेते आणि कार्यकर्त्यांचं मनोबल ढासळेल, असं सांगतानाच काँग्रेसची अवस्था सध्या एक ना धड भाराभर चिंध्या अशी झाली आहे, असं ते म्हणाले. काँग्रेसमध्ये तरुणांचा मोठा भरणा आहे. पण काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळण्याची क्षमता कुणामध्येही नाही. जर क्षमता असेल तर काँग्रेस नेत्यांनी पुढे यावं आणि सांगावं आम्ही अध्यक्षपद सांभाळतो. पण एकाही तरुणाकडे तेवढी क्षमता आहे, असं सध्या तरी दिसत नाही, असंही ते म्हणाले.

सुशांतप्रकरणी ‘त्या’ नेत्याची माहिती देऊ

यावेळी अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सुशांतसिंह प्रकरणात सरकारमधील एक मंत्री आहे. हे मी आधीच बोललो आहे. याबाबत निलेश राणेही बोलले आहेत. सीबीआयने मला बोलवावं. मी माहिती द्यायला तयार आहे, असं राणे म्हणाले.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत हंगामी अध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. केवळ एका वर्षासाठी पक्षाचे हंगामी अध्यक्ष झाले असून गेल्या १० ऑगस्ट या दिवशी हा कार्यकाल पूर्ण झाला आहे. हे पाहता आणि पक्षाने योग्य त्या व्यक्तीची या पदासाठी निवड करावी असे सोनिया गांधी यांनी बैठकीत म्हटले आहे. आज सकाळी ११ वाजता काँग्रेस कार्यकारिणीची नियोजित बैठक सुरू झाली. सुरुवातीलाच पक्षाध्यक्ष या नात्याने सोनिया गांधी यांनी उपस्थित नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. या नंतर आता हंगामी पक्षाध्यक्ष पदासाठी कोणाची निवड करावी, हा मुद्दा काँग्रेस कार्यकारिणीपुढे आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here