अहमदनगर : देशप्रेम, राष्ट्रध्वजाप्रती आदर या गोष्टी केवळ सांगायच्या नव्हे तर प्रत्यक्ष कृतीत उतरवायच्या असतात, हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. तेही थेट जम्मूमध्ये… जम्मूमधील एका उद्यानातील तिरंगा खराब झाल्याचे आढळून आले. तो बदलण्यासाठी आणि विशेष म्हणजे याकडे तेथील प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनविसेच्या कार्यकर्त्यांनी नगरहून जम्मूला कुरिअरद्वारे तिरंगा पाठवून दिला आहे. तेथील प्रशासनाला याची माहिती देऊन तो बदलण्याची विनंतीही केली आहे.

आम्ही सोबत एकत्र वाढलो, मध्यस्थीची गरज नाही; मनसेसोबत युतीवर संजय राऊतांचं उत्तर

त्याचे असे झाले… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा काही कार्यकर्ते आणि मित्रांसोबत अमरनाथ यात्रेला गेले आहेत. परतीच्या वाटेवर त्यांना जम्मूत मुक्काम करावा लागला. त्यावेळी तेथील बाग ए बाहू या उद्यानात ते गेले होते. तेथे एका ठिकाणी अतिशय जीर्ण अवस्थेतील तिरंगा त्यांना पहायला मिळाला. तिरंग्याचा अवमान नको, म्हणून त्यांनी तो काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो घट्ट बसविलेला असल्याने निघाला नाही. त्यामुळे सुमित वर्मा यांनी तो गुंडाळून ठेवला. याची माहिती त्यांनी तेथील प्रशासनाला दिली, शिवाय नगरच्या कार्यकर्त्यांनाही कळविली.

शिंदे गट उपाशी-दादांचे आमदार तुपाशी, सरकारला पाठिंबा दिल्याबरोबर मोठं गिफ्ट, नियोजनही झालं
हे दृष्य पाहून नगरमधील त्यांचे कार्यकर्तेही अस्वस्थ झाले. तेथील राष्ट्रध्वज बदलण्यासोबतच याकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधायला हवे, यासाठी त्यांनी नगरहून झेंडा पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जम्मूमधील त्या उद्यानाच्या केअर टेकरचा क्रमांक शोधून काढला. केअर टेकर हरमितसिंग यांच्याशी नगरहून धीरज सारसर यांनी संपर्क साधला. त्यांना उद्यानातील तिरंगा ध्वज खराब झाल्याची माहिती दिली. सोबतच आम्ही तेथे लावण्यासाठी नगरहून तिरंगा ध्वज कुरिअरने पाठवित आहोत. तो आल्यावर जीर्ण तिरंगा ध्वज बदलून त्याजागी हा नवा ध्वज लावावा, अशी विनंती केली.

काँग्रेसचे आमदार अजितदादांच्या संपर्कात, लवकरच त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, कॅबिनेट मंत्र्याने फोडला बॉम्ब
हरमितसिंग यांनी ती मान्य केली. त्यानुसार आता नगरहून जम्मूला कुरिअरने तिरंगा ध्वज पाठविण्यात आला आहे. तो तेथे मिळाल्यावर बदलून घेण्याचे आश्वासन हरमितसिंग यांनी नगरच्या कार्यकर्त्यांशी फोनवर बोलताना दिले आहे. जम्मूत थांबलेले सुमित वर्मा नगरला यायला निघाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here