अहमदनगर : सेवानिवृत्ती काही दिवसांवर आली होती. त्यानंतर सैन्य दलातील नोकरी सोडून गावी स्थायिक व्हायचे होते. अशातच कोपरगाव तालुक्यातील हवालदार दिपक कृष्णा आहेर (वय ४१) आजारी पडले. त्यांच्यावर पुण्यातील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. आजारपण बळावत गेले आणि त्यातच त्यांचे निधन झाले. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी या त्यांच्या मूळ गावी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
भारतीय सैन्यदलातील २५३ मेडिअम रेजिमेंटचे हवालदार दिपक कृष्णा आहेर यांचे ९ जुलैला पुण्यातील कमान हॉस्पिटलमध्ये निधन झाले. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोळपेवाडी व सुरेगाव ग्रामस्थ दुकाने बंद ठेवून अंत्य यात्रेत सहभागी झाले होते. महाराष्ट्र पोलीस दल व भारतीय लष्कराच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून, बिगुल वाजवत हवालदार आहेर यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.

सैन्यदलाच्या वतीने नायब सुभेदार शामसुंदर, जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोपरगावचे तहसिलदार संदिपकुमार भोसले, माजी आमदार अशोक काळे, जिल्हा माजी सैनिक कल्याण बोर्डाच्या वतीने सुभेदार धन्यकुमार सरवदे, सुभेदार यमाजी चेहडे,पोलिस उपनिरीक्षक महेश कुसारे, माजी सैनिक संघटनेच्या वतीने अध्यक्ष युवराज गांगवे, सुभेदार मारुती कोपरे, संदिप कोळपकर, स्वच्छतादूत सुशांत घोडके, संरपच सुर्यभान कोळपे, शंशिकांत वाबळे, निवृत्ती कोळपे यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
रविवारी सकाळी दिपक यांच्या निधनाची बातमी कळताच आहेर कुटुंबासोबतच कोळपेवाडी ग्रामस्थांना शोक अनावर झाला. काही दिवसांवर निवृत्ती आलेली असताना त्यांच्या अचानक सोडून जाण्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं आहे. आहेर २००० मध्ये सैन्य दलात भरती झाले. त्यांची सेवा समाप्त होण्यास काही दिवसच शिल्लक राहिले होते.