अकोला : अकोला जिल्ह्यातील माना रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाच्या खालचा मलमा वाहून गेल्याने रेल्वे वाहतूक सद्यस्थितीत बंद आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सध्या अकोला-नागपूर-भुसावळकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प आहे.

अकोला जिल्ह्यातील माना रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाच्या खालील मलमा वाहून गेल्याने रेल्वे वाहतूक गेल्या काही तासांपासून बंद आहे, ज्याचा हजारो प्रवाशांना फटका बसला आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. माना रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे रूळाखालून वाहणाऱ्या नाल्याला देखील पूर आल्याने हा प्रकार घडला आहे. दरम्यान गस्तीवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

Vedanta Foxconn : महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला पळवला, आता फॉक्सकॉनने वेदांताशी भागिदारीच मोडली
सध्या अकोला-नागपूर-भुसावळकडे जाणाऱ्या दोन्ही रेल्वे लाईनवरील रेल्वे वाहतूक सेवा ठप्प आहे. आज सायंकाळी सहा वाजल्यापासून रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम सुरू असल्याने रेल्वे वाहतूक बंद आहे. दरम्यान नागपूर-मुंबई मुख्य रेल्वे लाइन बंद आहे. अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर अनेक रेल्वे जागेवरच थांबवण्यात आले आहेत.

दरम्यान, काही रेल्वे स्थानकावरच थांबविण्यात आल्या आहेत. आणखी चार ते पाच तास रेल्वेचं काम सुरू राहणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सेवानिवृत्तीला काहीच दिवस उरले होते, जवानाला आजारपणाने ग्रासलं, अन् नको ते होऊन बसलं
अमरावती-मुंबई, गोंदिया मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस, हावडा मुंबई मेल ह्या आणि इतर गाड्यांची वाहतूक धीम्या गतीने सुरु आहेत. तर काही मेल गाड्या थेट रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या, दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. रिलीफ ट्रेन घटनास्थळी दाखल झाली आहे.

प्लॅटफॉर्मवर जेवणाचा डबा धुण्यासाठी उभ्या राहिलेल्या मुलाला रेल्वेची धडक, जागीच मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here