राज्यात करोना रुग्णांचे प्रमाण वाढत असतानाच इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे झाल्यानं करोनाच्या विळख्यात सापडलेल्या महाराष्ट्राला काही अंशी दिलासा मिळत आहे. आज १४ हजार २१९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळं आत्तापर्यंत ५ लाख ०२ हजार ४९० जण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२. ४७ टक्के इतका झाला आहे.
वाचाः
आज राज्यात ११ हजार ०१५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आत्तापर्यंत राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ६ लाख ९३ हजार ३९८ इतकी झाली आहे. तर, राज्यात सध्या १ लाख ६८ हजार १२६ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३६ लाख ६३ हजार ४८८ चाचण्यांपैकी ६ लाख ९३ हजार ३९८ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
वाचाः
राज्यात आज २१२ करोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोना मृतांची संख्या २२ हजार ४६५ इतका झाला आहे. सध्या राज्यात १२ लाख ४४ हजार ०२४ व्यक्ती होम क्वारंटाइनममध्ये आहेत. तर, ३३ हजार ९२२ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
(आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-७४३ (२०), ठाणे- ११५ (५), ठाणे मनपा-१३२ (६), नवी मुंबई मनपा-३२९ (१), कल्याण डोंबिवली मनपा-१९२ (१), उल्हासनगर मनपा-१५ (१६), भिवंडी निजामपूर मनपा-१६, मीरा भाईंदर मनपा-७४ (४), पालघर-४६, वसई-विरार मनपा-१२० (२), रायगड-१३८ (५), पनवेल मनपा-१३८, नाशिक-१७५ (२), नाशिक मनपा-६९९ (४), मालेगाव मनपा-४० (१), अहमदनगर-२७० (७),अहमदनगर मनपा-१२८ (२), धुळे-२२२ (४), धुळे मनपा-११४ (२), जळगाव-५३९ (१५), जळगाव मनपा-११० (३), नंदूरबार-११८, पुणे- ३८२ (४), पुणे मनपा-११०७ (१६), पिंपरी चिंचवड मनपा-८१५ (४), सोलापूर-३१० (९), सोलापूर मनपा-५७ (१), सातारा-४४६ (१०), कोल्हापूर-४२६ (७), कोल्हापूर मनपा-२४३, सांगली-१५२ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-२७२ (३), सिंधुदूर्ग-६१, रत्नागिरी-९६ (२), औरंगाबाद-१६३ (४),औरंगाबाद मनपा-१७८ (२), जालना-३३ (१), हिंगोली-५, परभणी-२० (१), परभणी मनपा-३०, लातूर-५६ (४), लातूर मनपा-२८ (३), उस्मानाबाद-२०२ (१),बीड-१३८ (७), नांदेड-९४ (२), नांदेड मनपा-७३ (२), अकोला-३९, अकोला मनपा-८, अमरावती-४४, अमरावती मनपा-९४, यवतमाळ-६२, बुलढाणा-६२, वाशिम-५३ (१), नागपूर-१७८ (३), नागपूर मनपा-४७८ (१५), वर्धा-५, भंडारा-१६ (१), गोंदिया-४० (२), चंद्रपूर-१६, चंद्रपूर मनपा-३१ (१), गडचिरोली-५, इतर राज्य २४ (२).
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
I really like and appreciate your blog post.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.