अलीकडेच सोन्या आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यात सोने-चांदीचे प्रतितोळा भाव उच्चांकावर झेपावले होते तर मे आणि जून महिन्यात दरांमध्ये नरमाई दिसून आली. मात्र जुलैच्या सुरूवातीपासून दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत उलथापालथ होताना दिसत आहे. महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीच्या किमतींनी भरारी घेतली होती, पण आता किमती पुन्हा एकदा आवाक्यात येत आहेत. अशा स्थितीत ग्राहकांनी भाव कमी होण्याची आणखी वाट पाहावी की खरेदीची घाई करावी असा प्रश्न सध्याच्या अनिश्चितेत उपस्थित होत आहे. दरम्यान, आज खरेदीला बाहेर जाण्यापूर्वी ११ जुलैसाठी सोने चांदीचे दर अपडेट्स झालेले दर तपासून घ्यावे.
सोने-चांदीचा आजचा भाव
तुम्ही आता देशभरात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अजिबात उशीर करू नका कारण उच्च पातळीववरून सोने सुमारे टेन हजार १०० रुपयांनी स्वस्तात झाले आहे, त्यामुळे खरेदीची ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. बाजारात २४ कॅरेट आणि २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात सुमारे ७० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून देशातील सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅम भाव ५९ हजार ४१० रुपये, तर २२ कॅरेट १० ग्रॅम ५४ हजार ४५० रुपये होता.
MCX वर सोने स्वस्त तर चांदी स्थिर
MCX वर सोन्याचा दर सुमारे ७० रुपयांनी ५८ हजार ६२० रुपये प्रति १० ग्रॅमवर घसरला आहे. मात्र, चांदीचा भाव स्थिर असून एमसीएक्सवर चांदीचा दर १० रुपयांनी मजबूत होऊन ७१ हजार ३७५ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
तुमच्या शहरांतील आजचे दर असे चेक करा!
दरम्यान तुमच्या शहरातील २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही ८९५५६६४४३३ वर मिस्ड कॉल करू शकता. थोड्याच वेळात SMS द्वारे तुम्हाला दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी ibja च्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
जागतिक बाजारात सोने-चांदी
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या किमतीत थोडी मजबूती दिसत असून कोमॅक्सवर सोने प्रति औंस $१९३१ वर तर चांदीही किंचित वाढीसह २३.३९ डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. डॉलर निर्देशांक आणि अमेरिकेतील महागाईचे आकडेमुळे सोन्या-चांदीत वाढ होत आहे.