ओबेरॉय ग्रुप ऑफ हॉटेल्सचे संस्थापक मोहन सिंग ओबेरॉय यांचे यश अनेकांसाठी एक उदाहरण आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर ते शिमल्यातील एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट बनले जेणेकरून कुटुंबाचे पोट भरू शकेल. क्लार्कची नोकरी करून त्यांनी अनुभव मिळवला आणि १९३४ मध्ये पहिले हॉटेल उघडले, तेव्हापासून या ग्रुपच्या ताफ्यात ३१ लक्झरी मालमत्ता आहेत. भारताच्या फाळणीपूर्वी झेलम जिल्ह्यात (आता पाकिस्तानात) त्यांचा जन्म झाला. वडिलांच्या अकाली निधनामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा भार त्यांच्या खांद्यावर पडला.
बुटाच्या कारखान्यात काम केले
कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोहन ओबेरॉय आपल्या मामाच्या बुटांच्या कारखान्यात काम करू लागले. पण काही दिवसांनी भारत-पाक फाळणीच्या काळात झालेल्या दंगलीमुळे कारखाना बंद पडला आणि ते शिमल्यात आले, जिथे सेसिल हॉटेलमध्ये डेस्क क्लर्क म्हणून काम करू लागले. पण हे कौशल्य त्यांना एक दिवस देशातील सर्वात यशस्वी हॉटेल चेन तयार करण्यात मदत करेल, याबाबत कदाचितच त्यांना माहिती होती.
…मग खेळला मोठा डाव
सेसिल हॉटेलमधून मोहन सिंग ओबेरॉय यांनी पैसा आणि अनुभव कमावला व १९३४ मध्ये ‘द क्लार्क्स हॉटेल’ म्हणून त्यांची पहिली मालमत्ता जमवली. मालमत्ता खरेदी करण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीच्या दागिन्यांसह सर्व मालमत्ता गहाण ठेवल्या. त्यांच्या मेहनतीचे परिणाम लवकरच दिसू लागले आणि हॉटेलमधून कमाई करून अवघ्या पाच वर्षांत त्यांनी संपूर्ण कर्ज फेडले.
त्यांच्या नशिबाने त्यांना योग्य ठिकाणी आणले आहे, हे आत्तापर्यंत मोहन सिंग ओबेरॉय यांना कळून चुकले होते. यानंतर ते कोलकात्याच्या ग्रँड हॉटेलच्या खरेदीकडे वळले. त्या काळात कोलकात्यात कॉलराची साथ पसरली असतानाही मोहन सिंग यांनी हॉटेल खरेदीचा करार पूर्ण केला आणि शेवटी त्यांचे नाव दूरदर्शी हॉटेल व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध झाले.
उभा केला ओबेरॉय साम्राज्य
यानंतर जणू काही ओबेरॉय यांच्या स्वप्नांना पंखच लागली. भारतासह जगभरात एकामागून एक हॉटेल्स खरेदी करण्यास सुरूवात केली परिणामी आता ओबेरॉय ग्रुपची एकूण ३१ लक्झरी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आहेत. भारतीय हॉटेल उद्योगात दिलेल्या लक्षणीय योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने २००१ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
मोहन सिंग ओबेरॉय यांना भारतीय हॉटेल उद्योगाचे जनक म्हटले जात आहे. आणि सध्या ओबेरॉय ग्रुपचे बाजारमूल्य १२ हजार ७०० कोटी रुपये असून भारताव्यतिरिक्त या ग्रुपची हॉटेल्स चीन, UAE, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि इतर अनेक देशांमध्ये पसरलेली आहेत.