चंदिगडः हरयाणाचे मुख्यमंत्री हे करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याची माहिती स्वत: खट्टर यांनी ट्विट करून दिली आहे. सोमवारी आपली करोना चाचणी घेण्यात आली. त्याचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, असं मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते खट्टर यांनी ट्विट केलं आहे.

‘आज माझी करोना चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या सर्व सहकार्‍यांना आणि संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या चाचण्या करुन घ्याव्यात, असं मी आवाहन करतो. माझ्या निकटवर्तीयांनी त्वरित स्वतःला क्वारंटाइन करावं’, असं आवाहन खट्टर यांनी ट्विट करून केलंय.

गजेंद्रसिंह शेखावत यांना भेटले होते खट्टर

मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची अलिकडेच भेट घेतली होती. शेखावत हे करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर खट्टर यांनी स्वत: ला क्वॉरंटाइन केलं होतं. यानुसार त्यांची करोना चाचणी घेण्यात आली. मनोहर लाल खट्टर यांनी २० ऑगस्ट रोजी करोना चाचणी केली होती. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. पण त्यांनी स्वत:ला तीन दिवस क्वारंटाइन करून घेतले होते.

गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त अनेक अधिकारी उपस्थित होते. शेखावत यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वॉरंटाइन राहून करोना चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. शेखावत सध्या रुग्णालयात दाखल आहेत.

विधानसभेचे अध्यक्ष कोरोना बाधित

हरयाणा विधानसभेचे अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांचा करोना चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. यासह, हरयाणा विधानसभेतील इतर ३३० जणांची करोना चाचणी घेण्यात आली आहे. हरयाणा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन हे २६ ऑगस्ट म्हणजे येत्या बुधवारपासून सुरू होणार आहे. यापूर्वी रविवारी विधानसभेचे ६ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here