किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना अश्विनने क्रीझ सोडून पुढे गेलेल्या बटलरला मांकड रनआऊट केले होते. यानंतर एकच वादंग झाला होता. पण मी जे काही केले नियमानुसारच केले, असे अश्विनने म्हटले होते. भारताच्या विनू मांकड यांनी ऑस्ट्रेलियाच्या बिल ब्राऊन या फलंदाजाला नॉन स्ट्रायकरवर असताना रनआऊट केले होते. ही गोष्ट १९४७ साली घडली होती आणि त्यानंतर या प्रकारच्या रनआऊटला मांकड रनआऊट, असे म्हटले जाऊ लागली.
अश्विनने जी गोष्ट केली होती, ती नक्कीच चुकीची नव्हती, पण ही गोष्ट त्याला आपण दिल्लीच्या संघात करायला देणार नसल्याचे संघाचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने सांगितले होते. त्यामुळे आता काय करायचे, हा प्रश्न अश्विनपुढे होता. त्यामुळे अश्विनने आता थेट क्रिकेटमध्ये ‘फ्री-बॉल’चा नियमही असावा, अशी मागणी केली आहे.
‘फ्री-बॉल’चे नियम असतील तरी काय…‘फ्री-बॉल’ची मागणी करताना त्याबाबतचा नियमही अश्विनने स्पष्ट केला आहे. अश्विनने सांगितले की, ” गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी जर दुसऱ्या टोकाकडील फलंदाजाने क्रीझ सोडले तर गोलंदाजाला त्याला बाद जर करता आले नाही तर ‘फ्री-बॉल’चा नियम बनवण्यात यावा. गोलंदाजीच्या बाजूकडील फलंदाज चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीझबाहेर पडला तर ‘फ्री-बॉल’ देण्यात यावा. या ‘फ्री-बॉल’नुसार फलंदाजी करत असलेल्या संघाच्या पाच धावा कमी करण्यात यावा. फलंदाजाने चूक केल्याबद्द संघाला हा दंड करायला हवा.”
जेव्हा अश्विनने ही गोष्ट केली होती. त्यावेळी तो किंग्ज इलेव्हन या संघात होता. पण या आयपीएलच्यावेळी अश्विन हा दिल्लीच्या संघात असणार आहे. त्याचबरोबर अश्विनच्या दिल्ली संघाचे प्रशिक्षकपद हे पॉन्टिंगकडे आहे. त्यामुळे पॉन्टिंग आता अश्विनबरोबर काय संवाद साधणार आहे, याबाबत त्याने आपली भूमिका व्यक्त केली आहे. पॉन्टिंग म्हणाला की, ” अश्विनने जे मांडक रनआऊट केले होते, ते चुकीचे होते, असे मला वाटते. ही गोष्ट खेळभावनेला धरून नाही, असे मला वाटते. त्यामुळे याबाबत अश्विनबाबत मी या गोष्टीवर संवाद साधणार आहे. अश्विन मला सांगेन की, हे नियमाला धरून आहे. पण माझ्या संघात असताना तरी त्याला ही गोष्ट मी करायला देणार नाही.”
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
I really like and appreciate your blog post.
I really like and appreciate your blog post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.