सोलापूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य माणसात मिसळून कायमच आपण त्यांच्यातील एक असल्याचे दाखवून देत असतात. तसेच आपले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे सांगत असतात. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे या देखील त्याला अपवाद नाहीत यांचा प्रत्यय नुकताच अक्कलकोट येथे पहायला मिळाला.

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे कुटुंबातील काही सदस्यांनी नुकतीच सोलापुरातील अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या पादुका तसेच समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यानंतर प्रथेप्रमाणे त्यांनी अन्नछत्राला भेट दिली. मात्र, यावेळी त्यांनी स्वामींचे सर्वसामान्य सेवेकरी बनून स्वामी भक्तांना अन्नदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर स्वतः हातात भाजी आणि भाताचे भांडे घेऊन त्यांनी वाढपी बनून सर्वसामान्य भक्तांना आग्रहपूर्वक प्रसाद वाढला. तसेच त्यांना वाढून झाल्यानंतरच स्वतः आपल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेत स्वामी भक्तांसोबत बसून प्रसाद ग्रहण केला.

विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावात आषाढीचा मोठा उत्सव; भाविकांची चोख व्यवस्था, १२ तास अखंड अन्नदान

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा हा साधेपणा पाहून उपस्थित भक्तगण देखील मनोमन सुखावले. एकीकडे आमदार, खासदार स्वामींच्या दर्शनासाठी आले की त्यांचे दर्शन होईपर्यंत सर्वसामान्य भक्तांना ताटकळत थांबावे लागते. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी आपला मिसेस मुख्यमंत्रीपदाचा बडेजाव बाजूला ठेवत सर्वसामान्य भक्तांप्रमाणे प्रसाद वाढतायत आणि भक्तांसोबत पंगतीला बसूनच तो ग्रहण करतायत हे पाहून उपस्थित भक्तांनी त्यांचे कौतुक केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेकदा सर्वसामान्य माणसात मिसळून त्यांच्यातील एक होऊन वावरताना आपल्याला दिसतात. मात्र त्यांच्या पत्नी देखील त्याला अपवाद नाहीत हे त्यांच्या या छोट्याशा कृतीतून दिसून आले.

गुप्तधनाच्या आशेने दुर्मीळ कासव घरी आणलं, पैशांच्या पावसाऐवजी तुरुंगाची हवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here