: करोनाची साथ कमी होत असल्याचे लक्षात येत असले तरी ‘गाफील राहू नका, अद्याप धोका टाळला नाही’ असा इशारा देत शहराला करोनाचा विळखा कायम असल्याचे सिरो सर्वेक्षण अहवालानंतर तज्ज्ञांनी स्पष्ट केले. शहरात केलेल्या कोविड सिरो सर्वेक्षणात शहरातील ११.८१ टक्के म्हणजे १ लाख ७० हजार नागरिकांमध्ये कोविड विरोधी प्रतिद्रव्ये (अँटीबॉडीज) आढळून आल्या असल्याचे जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हा अहवाल शहराच्या लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करत असल्यामुळे लोकसंख्येनुसार कोविड विरोधी प्रतिद्रव्ये आढळून आलेल्यांची संख्या १ लाख ७० हजार असू शकते हा केवळ अंदाज असल्याचेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. औरंगाबाद शहरामध्ये १० ते १६ ऑगस्ट दरम्यान करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणात शहरातील सर्व ११५ वार्डांमधील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार एकूण ४ हजार ३२७ नमुने तपासण्यात आले. यामध्ये १० ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचाही ३० क्लस्टर पद्धतीने अभ्यास करण्यात आला. ११.८१ टक्क्यांमध्ये झोपडपट्टीतील लोकसंख्येत हे प्रमाण १४.५६ टक्के तर इतर लोकसंख्येत १०.६४ टक्के आहे.

यावेळी घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या की, आपल्याला आणखी बरीच लढाई लढायची आहे, शहरी भागात रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत असली तरी ग्रामीण भागामध्ये रुग्णसंख्या वाढत आहे त्यानुसार आपल्याला नियोजन करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. सिरो सर्वेक्षणाच्या अहवालानुसार आता लॉकडाऊनचा फारसा उपयोग राहणार नसल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले. शहरातील सिल्लेखाना- नुतन कॉलनी, म्हाडा कॉलनी, जूना बाजार, न्यायनगर, निझामगंज- संजयनगर या पाच वॉर्डामधील लोकांमध्ये सर्वाधिक प्रतिद्रव्ये आढळून आले असून जय विश्वभारती कॉलनी, विश्वासनगर, जवाहर कॉलनी – शास्त्रीनगर, संत ज्ञानेश्वरनगर या पाच वार्डांमध्ये सर्वात कमी म्हणजे शून्य टक्के लोकांमध्ये कोविड विरोधी प्रतिद्रव्ये आढळून आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here