धाराशिव : धाराशिव पोलिसांनी मोठी कारवाई करत वाशी शहरातील एका मोठ्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारला. या कारवाईत २४ जणांच्या मुसक्या आवळण्याच आल्या असून १० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना खबऱ्याचा फोन आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींची संख्या जास्त असल्यामुळे जुगाऱ्यांना पोलिसांनी पोलीस ठाण्यापर्यंत चालतच नेले. या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पांलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीत अवैद्य धंदयाची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिला होते. रविवारी, ९ जुलै रोजी ४ वाजण्याच्या सुमारास एम. रमेश सहाय्यक पोलीस अधीक्षक एम.रमेश (उप विभाग कळंब) यांना पोलीस स्टेशन वाशी हद्दीत पारा चौक येथे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, जुने बसस्थानकाच्या बाजूला तिर्रट नावाचा जुगार चालू आहे. ही माहिती खात्रीशीर असल्याचे समजल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कळंब येथील अधिकारी व अमंलदार यांच्यासह त्यांनी ४.३० वाजता हा छापा मारला.

मंत्रिमंडळ विस्तारात कोकणातून गोगावले यांचे नाव निश्चित, शिंदे गटाकडून डॉ. किणीकर, शिरसाट यांनाही स्थान?
तेथे २४ लोक गोलकार बसून तिर्रट नावाचा जुगार खेळत असतांना आढळले. त्यांच्याकडे एकूण रोख रक्कम ९९,०१० ₹ तसेच १२ मोटर सायकली होत्या. त्यांची अंदाजे एकूण किंमत ५,६५,००० व एकूण २३ मोबाईल फोन (एकूण २,०९००० रु) तसेच एकूण पत्याचे २५५ बॉक्स (किंमत अंदाजे १,९८,००० रुपये) असा एकूण १०,७१,९१० रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींविरुध्द कलम ४,५ (महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम ४,५ प्रमाणे पोलीस ठाणे वाशी येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

४६ वर्षांनंतर पहिल्यांदाच मंदिर आले पूर्णपणे पाण्याबाहेर, दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पांलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या आदेशाने एम. रमेश सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश (उपविभाग कळंब), यांच्या मार्गदशर्नाखाली पोलीस स्टेशन कळंब व उपविभागीय पोलीस अधिकारी कळंब येथील पोलीस उपनिरिक्षक पुजरवाड, पोलीस अमंलदार ७४८/ फतेपुरे, ९७६/ तारळकर, पोलीस नाईक १०६५/ सय्यद, ४८१/ जाधव, पोलीस ठाणे कळंब, पोलीस नाईक शेख, पोलीस अमंलदार भांगे, पठाण, खांडेकर, गरड, राऊत, चव्हाण, पोलीस हवालदार चाफेकर, पोलीस ठाणे वाशी येथील सहा. पोलीस निरीक्षक ससाणे, पोलीस हावलदार लोंढे, पोलीस नाईक लाटे, यादव, सय्यद, सुरवसे, पोलीस अमंलदार भैरट वारे, घुले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आम्हाला खबऱ्याने खबर दिली की वाशी शहरात मोठा जुगार अड्डा सुरु आहे. या माहितीची खात्री केल्यानंतर छापा मारला असता आरोपी मोठया प्रमाणात आढळून आले. वाहनांची संख्या कमी आणि आरोपी जास्त होते. शिवाय छाप्याच्या ठिकाणापासून वाशी पोलीस ठाणे जवळ असल्यामुळे आरोपींना आम्ही चालत पोलीस ठाण्यापर्यंत घेऊन गेलो.

एम. रमेश, सहाय्यक पोलीस अधिक्षक, कळंब.

Isha Ambani: मुकेश अंबानींचा लाडक्या लेकीवर विश्वास, आणखी एका कंपनीची सोपवली जबाबदारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here