नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री यांना दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती बिघडल्याने त्यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. फुफ्फुस आणि मूत्रपिंडाचा त्रास झाल्याच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पासवान यांना आधीपासूनच हृदयविकाराचा त्रास आहे. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. दिलासादायक म्हणजे त्यांची करोना चाचणी केल्याचं कुठलंही वृत्त नाही. गृहमंत्री अमित शहा यांच्यासह आतापर्यंत केंद्र सरकारमधील सहा मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पासवान यांना आरोग्याच्या बर्‍याच समस्या आहेत. त्यांचे हृदय देखील व्यवस्थित काम करत नाही. पण दिलासादायक बाब म्हणजे सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, असं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. तर पासवान यांचे सुपुत्र चिराग पासवान यांनीही ट्विट करून माहिती दिलीय.

रामविलास पासवान हे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत. याशिवाय ते बिहारच्या लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आहेत. लोकसभेत ते बिहारच्या हाजीपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. रामविलास पासवान ३२ वर्षात ११ वेळा निवडणुका लढले आहेत. यापैकी ९ निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. रामविलास पासवान यांनी सहा पंतप्रधानांसोबत काम केलं आहे. एक अनोखा विक्रम आहे.

रामविलास पासवान हे मूळचे बिहारमधील खगेरिया जिल्ह्यातील शराबान्नी गावचे आहेत. १९६० मध्ये राजकुमारी देवी यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना उषा आणि आशा या दोन मुली आहेत. मात्र १९८१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. यानंतर त्यांनी १९८३ मध्ये रीना शर्मा यांच्याशी लग्न केले. त्यांना एक मुलगी आणि मुलगा चिराग पासवान ही दोन मुले झाली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here