मुंबई : रतन टाटा यांच्या टाटा समूहातील कंपन्यांनी सातत्याने गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. आता रतन टाटांच्या एका कंपनीने गुंतवणूकदारांसाठी बंपर लाभांश जाहीर केला आहे. ही कंपनी गुंतवणूकदारांना प्रति शेअर २० रुपये लाभांश देणार आहे. लाभांश जाहीर झाल्यापासून हा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदार तुटून पडले आहेत.

रेकॉर्ड डेट जाहीर
हा शेअर बनारस हॉटेल्स लिमिटेड या टाटा समूहाच्या कंपनीचा आहे. या कंपनीच्या नावात टाटा नाही. मात्र, ही कंपनी टाटा समूहाची आहे. अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत, परंतु त्यांच्या नावात टाटा नाही. कंपनीने या लाभांशासाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.

Equity Market Investment: बाजारातील चढ उतारांमध्ये गुंतवणुकीचा गोल्डन नियम तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या
या गुंतवणूकदारांना लाभांश मिळेल
गेल्या शुक्रवारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. यादरम्यान, बनारस हॉटेल्स लिमिटेडच्या प्रत्येक शेअरवर गुंतवणूकदारांना २० रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. कंपनीच्या एजीएमची संमती मिळाल्यानंतर केवळ पात्र गुंतवणूकदारांना ४ सप्टेंबरनंतर लाभांश मिळेल, ज्यासाठी १७ ऑगस्ट २०२३ ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली असून कंपनीने यापूर्वी गुंतवणूकदारांना १० रुपयांचा लाभांशही दिला होता.

सुवर्ण संधी! टाटाच्या शेअरमध्ये अजून तेजीचे संकेत, तपशील जाणून पैसे गुंतवा
गुंतवणूकदारांना चांगला परतावा
बनारस हॉटेल्स लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. आजही कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सकाळी शेअर तेजीने उघडला. दिवसभरात तो ६०२० रुपयांपर्यंत पोहोचला होता. गुंतवणूकदारांच्या शेअरमध्ये चांगली खरेदी होताना दिसत आहे. गेल्या एका वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना १९९.९१ टक्के बंपर परतावा दिला आहे. तर पाच वर्षांत या शेअर्समधील गुंतवणूकदारांना ३५५.६२% परतावा मिळाला आहे.

ना हर्षद मेहता, ना झुनझुनवाला पहिल्या बिग बुलचे नाव माहिती आहे का? दीडशे वर्षांपूर्वी केलेली लाखोंची कमाई
टाटाचे iPhone बाजारात येणार
देशभरात स्मार्टफोनचे कोट्यवधी वापरकर्ते आहेत, परंतू अजूनही भारतीय मेड इन इंडिया स्मार्टफोनपासून वंचित आहेत. आता अ‍ॅपल आणि टाटा ग्रुपने आयफोन बनवण्यासाठी करार केला असून यामुळे लवकरच देशातील ग्राहकांना मेड इन इंडिया आयफोन मिळतील. मेड इन इंडिया असण्यासोबतच आयफोनच्या वाढत्या किमतीही कमी होण्याची शक्यता आहे. अ‍ॅपल या वर्षी iPhone १५ सीरीजचे दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here