मटा. प्रतिनिधी, पिंपरी: सातारासह चार जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या कुख्यात वाळू तस्कर याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून चार पिस्तूल आणि दोन काडतूस जप्त करण्यात आली आहेत. तर अन्य एकाला अटक करून त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन काडतूस जप्त केली आहेत. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने या कारवाईमध्ये एकूण ४७ गावठी पिस्टल आणि ६८ जिवंत काडतूस जप्त केली आहेत.

सहायक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेने जुलै २०२० मध्ये अवैध पिस्तूल तयार करून त्याची विक्री करणाऱ्या मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी पोलिसांनी ४२ पिस्तूल, गावठी कट्टे आणि ६४ काडतूस जप्त केली होती. या तपासात १५ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तर आणखी काही जणांची नावे निष्पन्न झाली होती.

याच प्रकरणात सातारा जिल्ह्यातील सोमनाथ उर्फ सोमाभाई रमेश चव्हाण (वय ३०, रा. कालगाव, ता. कराड, जि. सातारा) याचेही नाव निष्पन्न झाले होते. उंब्रज पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना त्याला अटक केली होती. सोमनाथ सातारा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला १७ ऑगस्ट ला कारागृहातून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून चार गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले. तसेच या प्रकरणातील तपासातून संतोष चंदू राठोड (वय २३, रा. तळेगाव दाभाडे) याचे नाव तपासात निष्पन्न झाले होते. आरोपी संतोष याच्यावर २०१८ मध्ये लोणावळा पोलिस ठाण्यात खुनाच्या त्याला अटक झाली होती. काही दिवसांपूर्वी आरोपी संतोष त्या गुन्ह्यात येरवडा कारागृहातून बाहेर आला होता. पोलिसांनी संतोषला १० ऑगस्ट ला अटक करून, एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.

आरोपी सोमनाथ हा कुख्यात वाळू तस्कर आहे. त्याची सातारा परिसरात ‘शूट ग्रुप’ नावाची गुन्हेगारी टोळी आणि “आई साहेब प्रतिष्ठान’ नावाची संघटना आहे. त्याची सातारा, सांगली, कोल्हापूर आणि ठाणे या जिल्ह्यात दहशत आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे १८ गुन्हे दाखल आहेत. २०१६ मध्ये निगडीतील कुख्यात गुंड कृष्णा डांगे उर्फ केडी भाई याच्या खून प्रकरणात सोमनाथ चव्हाण मुख्य आरोपी होता. तसेच २०१८ मध्ये भाजपाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्षावर झालेल्या खुनी हल्ल्यातील सोमनाथच हा मुख्य सूत्रधार होता.

वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे, सहायक निरीक्षक अंबरिष देशमुख, कर्मचारी प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, अदिनाथ मिसाळ, संतोष असवले. तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मोहम्मद गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिध्द पांढरे, प्रशांत सैद, सुनिल गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविद चव्हाण, नागेश माळी, राजेंद्र शेटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here