मुंबई- आणि काजोलचा तानाजी- द अनसंग वॉरिअर सिनेमा आज शुक्रवारी प्रदर्शित झाला. गुरुवारी या सिनेमाचं सेलिब्रिटींसाठी खास स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. यावेळी अजयचं संपूर्ण कुटुंब सिनेमा पाहण्यासाठी आलं होतं. युगला घेऊन स्क्रीनिंगला पोहोचली होती तर न्यासा थोड्यावेळानंतर एकटीच आली. स्क्रीनिंगवेळी न्यासा फार सुंदर दिसत होती यात काही शंका नाही.

न्यासाने पोल्का डॉट शॉर्ट ड्रेस घातला होता. यावेळी न्यासाने तिचे केस मोकळे सोडले होते. मोकळ्या केसांमुळे तिचं सौंदर्य अजून खुलून येत होतं. सध्या सोशल मीडियावर न्यासाचे स्क्रीनिंगवेळचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. आई- बाबांचा सिनेमा पाहण्याची उत्सुकता न्यासाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. जवळपास ११ वर्षांनंतर अजय आणि काजोल एकत्र सिनेमात काम करताना दिसणार आहेत. अजयचा हा १०० वा सिनेमा आहे.

तानाजी मालुसरे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत विश्वासू आणि शूर असा कर्तव्यनिष्ठ सेवक. स्वराज्यासाठीच्या अनेक कामगिऱ्या तानाजींनी फत्ते केल्या. आपल्या देदीप्यमान शौर्याने तानाजी मालुसरे हे नाव अजरामर योद्धा म्हणूनच कायम ओळखले गेले. याच योध्याची शौर्यगाथा ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात साकारली जात असून तानाजीच्या भूमिकेचे शिवधनुष्य अजय देवगणने उचलले आहे.

विशेष म्हणजे रियल लाइफमधील अजयची पत्नी काजोलच या चित्रपटात तानाजीच्या पत्नीची अर्थात सावित्रीबाईंची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात सैफ अली खान खलनायक साकारणार आहे. उदयभानच्या भूमिकेत सैफ दिसेल. याशिवाय चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका शरद केळकर तर जीजामातेची भूमिका पद्मावती राव साकारत आहे.

हा थ्रीडी चित्रपट आणि दीपिका पदुकोणचा अॅसिड हल्लापीडितेवर बेतलेला ‘छपाक’ चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असून दोन्ही चित्रपटांची चांगलीच टक्कर पाहायला मिळणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here