म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून, या आजारावर मात करणाऱ्यांचे प्रमाणही वाढते आहे. मात्र घरी होऊन बरे होऊन आलेल्या रुग्णांना खूप थकवा येणे, , झोप येणे, उत्साह नसणे असा त्रास जाणवतो. विषाणूचा मुकाबला करण्यासाठी तयार झालेली प्रतिकारशक्ती दीर्घकाळ उपयुक्त ठरत नसल्याचे डॉक्टरांना दिसून आले आहे. त्यामुळे करोनामुक्त झालेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

करोना संसर्गावर मात करण्यासाठी वैद्यकीय मदत देणाऱ्या डॉ. एस. एस. पवार यांनी सांगितले, ‘प्रत्येक रुग्णामधील रोगप्रतिकारशक्ती वेगवेगळी असते. त्यामुळे रुग्णाच्या शरीरात आवश्यक अॅण्टीबॉडी तयार होतीलच, असे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे काही व्यक्तींमध्ये होण्याचा धोका उद्भवतो. करोना आजारातून मुक्त झालेल्या रुग्णांनी मास्क लावणे, इतरांशी अंतर ठेवणे तसेच पोषक आहार घेणे महत्त्वाचे आहे. एकदा करोना झाला की पुन्हा तो होणार नाही या भ्रमात राहू नये.’

करोना संसर्गावर मात केलेल्या रुग्णाने व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे. करोना संसर्ग हा केवळ फुफ्फुसावरच नाही, तर संपूर्ण शारीरिक क्षमतेवर परिणाम करतो. अनेक महिलांना काम करताना तंबाखू तोंडात ठेवणे, मशिरी लावण्याची सवय असते. त्या काम होईपर्यंत काही खात नाहीत. या सवयी खूप घातक असल्याचेही डॉक्टर सांगतात. नियमित व्यायामाची सवय नसेल तर ही सवय लावून घ्यायला हवी. टप्प्याटप्याने शरीराला ऑक्सिजन पुरवठा योग्य प्रमाणात होण्यास व्यायामामुळे मदत होते. अशा रुग्णांनी पुन्हा गर्दीच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये.

निर्जुंतकीकरण करा

घरी विलगीकरणामध्ये असाल तर स्पर्श होत असलेल्या तसेच नसलेल्या वस्तूंचेही नियमित निर्जंतुकीकरण करा. चेहरा, नाक, डोळे, तोंडाला सतत स्पर्श करणे टाळा. काही तासांच्या अंतराने हात धुवा. फोनची स्क्रीनही पुसून घ्या. त्यामुळे मोबाइलच्या वरील भागातील विषाणू नष्ट होतात. घरी नियमित ऑक्सिमीटरने तपासणी करा. तसेच रोज नियमित चालण्याचा व्यायाम करा, असा सल्ला कोव्हिड कक्षामधील रुग्णांना वैद्यकीय उपचार देणाऱ्या डॉ. डी. एन. नायर यांनी दिला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here