सोलापूर: दहावीत शिकणाऱ्या मुलाने नववीतील विद्यार्थ्याला जीवे मारण्याची धमकी देत त्याकडून दहा लाख रुपये उकळले आहे. नववीतील पीडित विद्यार्थ्याने टप्प्याटप्प्याने घरातील कपाटात ठेवलेली रक्कम आरोपीला आणून दिली. कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली रक्कम पीडित विद्यार्थ्याच्या आईने पाहिली असता, मोठी रक्कम गायब झाली होती. आपल्या मुलाला विश्वासात घेऊन माहिती घेतली असता धक्कादायक त्याने धक्कादायक माहिती दिली.

विद्यार्थ्याचे वडील निवृ्त्त झाले आहेत. त्यांना निवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेत भर घालत आईने ते पैसे कपाटात ठेवले. दहावीच्या विद्यार्थ्याच्या एका नातेवाईकानेदेखील नववीतील विद्यार्थ्यास धमकी देत दोन लाख रुपये उकळले असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
टेक कंपनीच्या MD आणि CEOला दिवसाढवळ्या संपवलं; माजी कर्मचाऱ्याचे ऑफिसात घुसून तलवारीनं वार
पीडित मुलाची आई शिक्षिका आहे. तिला पतीने पाच लाख रुपये दिले होते. आईने त्यात भर घालून लॉकरमध्ये ११ लाख २५ हजार रुपये ठेवले. शिक्षिकेचा मुलगा नववीत शिकतो. त्याला दहावीत शिकणाऱ्या मुलाने जीवे मारण्याची धमकी देत टप्प्याटप्प्याने १० लाख रुपये उकळले. याप्रकरणी दहावीतील मुलासह एका नातेवाइकावर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी सिडगिद्दी यांचा सोलापूर शहरात कारखाना आहे. त्या खासगी शाळेत शिक्षिका आहेत. त्यांचा मुलगा शहरातील नावाजलेल्या शाळेत इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. त्याची मैत्री त्याच शाळेतील दहावीतील मुलाशी झाली. फिर्यादीच्या मुलाने कपाटातील पैसे मित्रासोबत खर्च केले. याप्रकरणी दहावीतील एक मुलगा व नातेवाईक आकाश खेड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
निवृत्त जवानाला निर्घृणपणे संपवलं; नसा कापल्या, डोक्यात कळशी घातली; मेहुणी बेपत्ता
दहावीच्या एका विद्यार्थ्याने नववीतील मुलाला उसने घेतलेले पाचशे रुपये दिले नाहीत. दहावीतील विद्यार्थ्याने पुन्हा पैसे मागताच नववीतील मुलाने नकार दिला. पुढे ठार मारण्याची धमकी देत पैसे मागितले. घाबरलेल्या नववीतील मुलाने आधी पाच हजार रुपये दिले. पुढे दहावीतील विद्यार्थी मित्र धमक्या देत गेला अन् मुलगा पैसे देत राहिला. दहावीच्या मुलाने असे ८ लाख रुपये उकळले.

दहावीतील मुलाने पैसे घेतल्याचा प्रकार त्याच्या नातेवाइकाला सांगितला. नातेवाइकानेही मुलाला धमकावत २ लाख रुपये घेतले. सहा महिन्यांनंतर घटना उघडकीस आली. कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आईने डिसेंबर २०२२ मध्ये मोजली होती. चावी कपाटातच ठेवलेली होती. त्यानंतर पैसे मोजल्यानंतर कपाटात फक्त एक लाख रुपये शिल्लक होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here