म. टा. प्रतिनिधी, मुंबई

गणेशभक्तांच्या गर्दीने फुललेले रस्ते, आकर्षक देखावे, अवाढव्य सेट, प्रचंड गर्दीच्या मिरवणुका, रेल्वे स्थानकांवरील गर्दी…लालबाग-परळ परिसरात दरवर्षी हमखास दिसणारे हे दृश्य यंदा फक्त आठवणींतच डोळ्यांसमोर तरळतेय. चैतन्यमय वातावरणाने भारून टाकणारा हा भाग सध्या शांत, सुना वाटतोय. हीच भावना समाजमाध्यमांवर पूर्वीची गर्दी आणि सध्याचे रिकामे रस्ते अशा फोटोंतून व्यक्त होत आहे. दरवर्षी वसई-विरार, कर्जत-खोपोलीवरून दररोज हजारो भाविक लालबाग-परळमध्ये येतात. ही संख्या लाखांवर जाते. त्यामुळे ११ दिवस या भागात जणू जत्राच भरते. यंदा मात्र हे चित्र पालटले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाची पंढरी म्हणून विभागाला ओळखले जाते. याच भक्तिरसात न्हाऊन निघण्यासाठी परळ, करी रोड, चिंचपोकळी रेल्वे स्थानकापासून गणेशभक्तांचे लोंढे एकाच दिशेने चालत असतात. अनेक प्रसिद्ध मंडळांचे गणपती याच भागात विराजमान होतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत लाखो गणेशभक्तांची पावले या भागात वळतात. यंदा मात्र करोना संसर्गाच्या संकटामुळे राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना दिल्या. मंडळांनीही ही सामाजिक जबाबदारी स्वीकारली. बाप्पाचे उपलब्ध करून देणे, आरोग्य तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन, जनजागृती कार्यक्रम यापुरताच यंदाचा गणेशोत्सव मर्यादित राहिला आहे. सुवर्ण किंवा हीरक महोत्सवी वर्ष असणाऱ्या अनेक मंडळांना वर्षभराचे नियोजन ऐनवेळी रद्द करण्याची वेळ आली आहे. गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवण्यासाठी अनेक मंडळांनी गणेशमूर्ती आणल्या आहेत. मात्र, त्यांची उंची मर्यादित आहे. एकूणच गिरणगावातील यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here